Israel-Hamas War | पाकिस्तानची कॉपी असलेला इराण अचानक गप्प का झाला? पडद्यामागून कोणी ढोस दिला?
Israel-Hamas War | बडबड करण्यापलीकडे इराण फार काही करु शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे. इस्रायल विरोधात युद्धाची भाषा करणारा इराण अचानक गप्प का झाला? पडद्यामागे काय चक्र फिरली? कुठली गोष्ट इराणच्या लक्षात आली?. 15 ऑक्टोबरला इराणने आपला कट्टर प्रतिस्पर्धी इस्रायलला काय इशारा दिलेला?
तेहरान : इस्रायल-हमास युद्धाला सुरुवात झाल्यापासून इराणकडून सतत धमक्या दिल्या जात होत्या. इस्रायल विरुद्ध युद्ध पुकारण्याची भाषा सुरु होती. इराण म्हणजे आखातामधला दुसरा पाकिस्तान आहे. पाकिस्तानकडे थेट भारताविरोधात युद्ध लढण्याची क्षमता नाही. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी गट उभे केले. त्या माध्यमातून तो भारताला त्रास देत असतो. इराण सुद्धा असाच देश आहे. ज्याने हिझबोल्लाह आणि हमास सारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ दिलं. या दोन्ही दहशतवादी संघटना इस्रायलवर हल्ले करत असतात. 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून अत्याचार केले. लहान मुलं आणि महिलांची हत्या केली. अत्याचार केले. हमासच्या या दहशतवाद्यांना इराणच पाठबळ होतं. इराण गेल्या कित्येक वर्षापासून हे करत आहे. त्यांनी इस्रायलविरोधात लढण्यासाठी हे दोन दहशतवादी गट उभे केलेत.
15 ऑक्टोबरला इराणने आपला कट्टर प्रतिस्पर्धी इस्रायलला इशारा दिला. गाझामध्ये हल्ले थांबवा अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, असं इराणचे परराष्ट्र मंत्री बोलले. ही धमकी दिल्यानंतर काही तासातच संयुक्त राष्ट्रात इराणचा स्वर नरमला. इराणने युद्धात पडणार नाही, असं जगाला आश्वस्त केलं. इस्रायलने आमच्या हिताला बाधा आणली किंवा आमच्या नागरिकांवर हल्ले केले, तरच कारवाई करु असं इराणने सांगितलं. इस्लामिक जगताच नेतृत्व करण्याची इराणची महत्वकांक्षा आहे. इस्रायली सैन्य गाझावर हल्ले करताना गप्प राहण इराणला परवडणार नाही. पण त्याचवेळी बडबड करण्यापलीकडे ते फार काही करु शकत नाही हे सुद्धा वास्तव आहे. इराणने आता काय ठरवलय?
अमेरिकेच समर्थन असलेल्या इस्रायलवर हल्ला केला, तर इराणला त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. इराणची अर्थव्यवस्था आधीच अडचणीत आहे. अशावेळी युद्धामध्ये पडल्यास जनतेच्या मनातील राग अजून उसळून येईल याची कल्पना इराणच्या शासकाना आहे. हेझबोल्ला किंवा हमास या दहशतवादी गटांना मर्यादीत स्वरुपात मदत करायची. थेट इराण या युद्धामध्ये अडकेल इतका तणाव वाढवायचा नाही, असं इराणच्या निर्णयकर्त्यांनी एकमताने ठरवलय. इराणमधील तीन वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राने हे वृत्त दिलय.