दारुबंदीचं अभियान राबवणारी ड्रिंकावेयर या संस्थेने तीन महिन्यांपूर्वी दावा केला होत की, जास्त दारु पिल्यास कोरोनाची लस घेतल्यानंतरही त्याचा शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. याशिवाय याचे पुरावे देखील समोर आल्याचं या संस्थेने म्हटलं होतं.
मात्र, या दाव्यांचं ब्रिटनच्या एका एजन्सीने खंडण केलं होतं. दारु पिल्यानंतर लसीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल, असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, असं या संस्थेने म्हटलं होतं.
अल्कोहोल किंवा दारुचा लसीच्या कार्यक्षमतेवर काहीच परिणाम होणार नाही. तुम्ही दारु पीत असाल तरी लस तिचं काम करेल, असं मत ब्रिटिश वैज्ञानिकांनी मांडलं आहे.
ब्रिटनमध्ये औषधांच्या सुरक्षिततेसंबंधित पॉलिसी बनवणाऱ्या MHRA संस्थेनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबतच्या अधिक माहितीसाठी हेल्थकेअरच्या तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला.
10-3-2-1 ट्रिकमध्ये 3 म्हणजे झोपेच्या तीन तास आधी जास्त खाणे थांबवा. डॉक्टर म्हणाले, 'हे छातीतील जळजळची समस्या दूर करते, ज्यामुळे झोपायला काहीच अडचण येत नाही. यासह, तीन तासांपूर्वी दारू पिणे देखील बंद केले पाहिजे. यामुळे मन शांत राहते आणि झोपायला मदत होते.
मात्र, तरीही जास्त दारु पिल्याने शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेवर खरंच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीर कोणत्याही औषधांना रिस्पॉन्स देत नाही. मात्र, दारु घेतल्यानंतर लसीची कार्यक्षमता कमी होते, असं कोणतंही संशोधन अद्यापतरी समोर आलेलं नाही.