इराण- इस्रायलमध्ये तणाव का वाढला? पश्चिम राष्ट्र इस्त्रायलसोबत
iran israel war news: सीरियामधील इराणी दूतावासावर इस्त्रायलने १ एप्रिल रोजी एअर स्ट्राईक केली होती. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे दोन टॉप कमांडरसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. इराणने इस्त्रायलला बदला घेण्याची धमकी दिली होती.
इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध सुरु असताना त्यात आता इराणची भर पडली आहे. शनिवारी मध्यरात्री इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. तब्बल २०० क्षेपणास्त्र इराणने इस्त्रायलवर डागले. त्यानंतर अमेरिकेसह सर्व पश्चिम देश इराणविरोधात इस्त्रायलसोबत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. तसेच व्हाइट हाऊसमध्ये नॅशनल सिक्योरिटी टीमची बैठक बोलवली. दुसरीककडे इराणने हल्ल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. इराण X ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये दुष्ट शासनाला दंड केला गेल्याचे म्हटले आहे. इराण आणि इस्त्रायल याच्यामधील संघर्ष का सुरु झाला? काय आहे ते कारण?
का केला इराणने हल्ला
सीरियामधील इराणी दूतावासावर इस्त्रायलने १ एप्रिल रोजी एअर स्ट्राईक केली होती. इस्त्रायलने एअर स्ट्राईक करुन इराणला कठोर संदेश दिला होता. इराणने जर हमास आणि हिजबुल्लाहसारख्या अतिरेकी संघटनांना मदत केली तर त्यांच्यावर हल्ला होईल. इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे दोन टॉप कमांडरसह १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणने इस्त्रायलला बदला घेण्याची धमकी दिली होती. त्यानुसार रमजान महिना संपल्यानंतर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला.
काय म्हणाले इस्त्रायल पंतप्रधान
इराणच्या हल्लानंतर इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लष्करी अधिकारी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली तसेच या हल्ल्यास जोरदार उत्तर देण्याचे देशाला संबोधित करताना सांगितले. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवण्याची मागणी त्यांनी केली. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले की, इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. जगाला तिसरे महायुद्ध परवडणारे नाही.
किती झाले नुकसान
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायलचे किती नुकसान झाले, यासंदर्भात आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितली की, इराणने इस्रायलवर डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. त्या इस्त्रायलच्या लष्करी तळाचे किरकोळ नुकसान झाले. इराणची बहुतेक क्षेपणास्त्रे लांब पल्ल्याच्या एरो एअर डिफेन्स सिस्टमद्वारे रोखली गेली. तसेच अनेक क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हवाई हद्दीबाहेर टाकण्यात आली.
हे ही वाचा
इराण की इस्रायल कोणाची पॉवर जास्त, नेतन्याहू म्हणाले, ‘जोरदार उत्तर देणार’