दुबईच्या वाळवंटात पूर येण्यामागचं कारण काय? लोकांचे का झाले हाल

दुबई सारख्या स्मार्ट सिटीमध्ये पूर आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. जगभरातून लोकं दुबईला फिरायला येत असतात. पण या वाळवंट प्रदेशात एका दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे चांगलेच हाल झाले. गाड्या पाण्याखाली गेल्या. वाहतूक बंद झाला आणि विमानतळ देखील बंद करावा लागले होते.

दुबईच्या वाळवंटात पूर येण्यामागचं कारण काय? लोकांचे का झाले हाल
dubai flood
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 4:41 PM

दुबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानमध्ये विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोलमडली. संपूर्ण शहरात पाणीच पाणी होते. लोक घरातच अडकून पडले होते एवढेच नाही तर दुबईहून दिल्लीला आणि इतर ठिकाणी जाणारी अनेक उड्डाणे देखील रद्द करावी लागली. कारण विमानतळावर ह पाणीच पाणी होते. UAE मधील भारतीय वाणिज्य दूतावासाने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा तेथून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत दुबईला किंवा यूएईच्या इतर शहरांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

75 वर्षात पहिल्यांदाच इतका पाऊस

मंगळवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे दुबई आणि आजुबाजुच्या परिसरात पूर आला होता. यातून सावरण्याचा लोकं प्रयत्न करत होते. कारण असं चित्र अनेकांना पहिल्यांदाच पाहिलं होतं. शुक्रवारी जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये, दूतावासाने सांगितले की अधिकारी कामकाज सामान्य करण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. प्रवाशांनी उड्डाणांच्या वेळेबाबत संबंधित विमान कंपन्यांकडून खात्री करून घेतल्यानंतरच विमानतळावर यावे, असा सल्ला विमानतळ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अनेक ठिकाणी पाणीच पाणी

दूतावासाने सांगितले की, ‘या आठवड्याच्या सुरुवातीला यूएईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला होता. परिस्थिती लक्षात घेता, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने येणाऱ्या फ्लाइट्सची संख्या तात्पुरती मर्यादित केली गेली आहे.जगातील सर्वात व्यस्त विमानतळ दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २४ तासांत पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर किंवा तेथून प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाशांना येथे प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय वाणिज्य दूतावासाने असेही म्हटले आहे की तेथे राहणारे भारतीय हवामानाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीसाठी +971501205172, +971569950590, +971507347676 आणि +971585754213 यांच्याशी संपर्क साधू शकतात.

यूएईमध्ये का आला पूर?

दुबई किंवा आसपासच्या शहरांमध्ये खूप कमी पाऊस पडतो. त्यामुळे येथे जास्त पाऊस पडण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे क्लाउड सीडिंग. याद्वारे ढगांमध्ये एक प्रकारचे बीज टाकून पाऊस पाडला जातो.

सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ढगांमध्ये पावसाच्या बिया पेरण्याच्या प्रक्रियेला क्लाउड सीडिंग म्हटले जाते. हे विमानाच्या मदतीने ढगांमध्ये फवारले जाते. ज्यामुळे पाऊस पडतो. हे तंत्रज्ञान UAE मधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वापरले जाते. रविवार आणि सोमवारसाठी क्लाउड सीडिंगचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतरच दुसऱ्या दिवशी मंगळवारी इतका पाऊस झाला की पूर आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.