Iran vs Paksitan | पाकिस्तान भारतासोबत करतो अगदी सेम तसच इराणने केलं, आधी हात मिळवला आणि नंतर…
Iran vs Paksitan | इराण सध्या आक्रमक मोडमध्ये आहे. एकापाठोपाठ एक बदल्याची कारवाई त्यांनी सुरु केलीय. त्यांनी पाकिस्तानात हल्ला केलाय. या हल्ल्यानंतर पाकिस्तान खवळला आहे. त्यांनी इराणला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे.
Iran Air strike in Pakistan | इराणने पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवर हल्ला केलाय. ड्रोन आणि मिसाइलने केलेल्या हल्ल्यात 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झाले आहेत. इराणच्या हल्ल्यात अनेक घरांच नुकसान झालय. इराणचे परराष्ट्र मंत्री अमीर अब्दुल्लाह्यान आणि पाकिस्तानचे केयरटेकर पीएम अनवर उल हक काकर यांच्या बैठकीनंतर काहीवेळाने हा हल्ला झाला. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक झाली. इराणचे परराष्ट्रमंत्री आणि पाकिस्तानी पीएम वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दावोसला गेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये दहशतवाद संपवण्याबद्दल चर्चा झाली.
इराणने दहशतवादी संघटना जैश अल अदलच्या ठिकाणांवर मंगळवारी रात्री हल्ले केले. जैश अल अदल एक सुन्नी दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानात राहून ते दहशतवादी कारवाया करत असतात. जैश अल अदल विरोधात इराणने केलेल्या या कारवाईने पाकिस्तान खवळला आहे. पाकिस्तानने इराणला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. आम्ही इराणच्या हल्ल्याचा निषेध करतो, असं पाकिस्तानने म्हटलय. आमच्या हवाई क्षेत्राच उल्लंघन आम्ही सहन करणार नाही. या हल्ल्यात दोन निरपराध मुलांचा मृत्यू झाला 6 जण जखमी झालेत.
इराणने हल्ल्यासाठी किती ड्रोन वापरली?
इराणने केलेली ही एकतर्फी कारवाई हे चांगल्या शेजाऱ्याच लक्षण नाही, असं पाकिस्तानने म्हटलय. इराणच्या कृतीने द्विपक्षीय विश्वास कमी होणार आहे. दहशतवादापासून सगळ्याच देशांना धोका आहे. दहशतवादावर मिळून कारवाई करण्याची गरज आहे. इराणच्या हल्ल्यानंतर जैश अल अदलच वक्तव्य समोर आलय. इराणने ड्रोन आणि मिसाइलने हल्ला केला. घरांना टार्गेट केलं. इराणने हल्ल्यासाठी कमीत कमी 6 ड्रोन वापरली असं जैश अल अदलने म्हटलं आहे.