Iran vs Israel : ‘ब्रो…ब्रो…इट्स…’, इस्रायलमधल्या भारतीयांनी सांगितला एअर स्ट्राइकचा थरारक अनुभव

Iran vs Israel : इराणने इस्रायलवर मंगळवारी एअर स्ट्राइक केला. एकापाठोपाठ एक जवळपास 200 मिसाइल्स डागली. त्यावेळी किती भितीदायक स्थिती होती? जो अनुभव आला, तो भारतीयांनी सांगितला आहे. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी, नोकरदार आहेत.

Iran vs Israel : 'ब्रो...ब्रो...इट्स...', इस्रायलमधल्या भारतीयांनी सांगितला एअर स्ट्राइकचा थरारक अनुभव
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 10:03 AM

इस्रायलमध्ये राहणारे भारतीय सध्या तणावाखाली आहेत. इस्रायलकडून सध्या त्यांच्या शत्रुंविरोधात मोठी सैन्य कारवाई सुरु आहे. त्याचवेळी शत्रूकडून सुद्धा इस्रायलवर हल्ले होत आहेत. मंगळवारी रात्री असाच हल्ला झाला. इराणने इस्रायलवर एकापाठोपाठ एक जवळपास 200 मिसाइल्स डागली. त्यानंतर तिथेच जीव वाचवण्यासाठी एकच पळापळ सुरु झाली. इस्रायलमध्ये नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने असलेल्या भारतीयांनी सुद्धा हा थरारक अनुभव घेतला. ‘दिवसेंदिवस स्थिती भयावह होत चालली आहे’ असं कोलकाता इथून आलेल्या निलब्जा रॉय चौधरी यांनी सांगितलं. तेल अवीवमधल्या विद्यापीठात त्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. “परिस्थिती खूपच कठीण आहे. याआधी कधी अशी भितीदायक स्थिती अनुभवली नव्हती” असं राजेश मेडीचेरला यांनी सांगितलं. ते तेलंगणहून आले आहेत.

तेलअवीव मधल्या इमारतीवर मिसाइल पडत असल्याचा व्हिडिओ राजेश यांनी शेअर केलाय. हे दृश्य पाहताना ‘ब्रो…ब्रो…इट्स फॉलिंग’ हे शब्द त्यांनी उच्चारले. तेल अवीवपर्यंत मिसाइल पोहोचलय यावर विश्वासच बसत नाहीय असं राजेश म्हणाले. इराणने थेट तेल अवीव पर्यंत मिसाइल हल्ला केल्याने इस्रायलमध्ये वास्तव्याला असलेले भारतीय नोकरदार आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. सध्या इथे असलेले भारतीय सुरक्षित आहेत. पण येणाऱ्या दिवसात तणाव आणखी वाढू शकतो.

इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना कसली प्रतिक्षा?

पश्चिम बंगालमधून अनेक जण शिक्षणासाठी इथे आले आहेत. शिक्षण घेऊन ते इस्रायलमध्ये नोकरी करतायत. आता लवकरात लवकर त्यांना घरी परतण्याची ओढ लागली आहे. सध्या इस्रायलमध्ये जाणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाण बंद आहेत. इस्रायलमधून बाहेर निघण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून काय मार्गदर्शक सूचना केल्या जातात, त्याची काल भारतीय प्रतिक्षा करत होते.

‘तो बॉम्ब त्याच्या घरावर पडला असता, तर?’

“काही दिवसांपूर्वी मित्राच्या घरापासून 100 मीटर अंतरावर बॉम्ब पडला. सीसीटीव्हीमध्ये ते फुटेज आहे. तो बॉम्ब त्याच्या घरावर पडला असता, तर?. मागच्यावर्षी सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धाचा आम्हाला फारसा परिणाम जाणवला नाही. पण यावेळी गोष्ट वेगळी आहे” असं निलब्जा रॉय चौधरी म्हणाल्या. त्या उत्तर इस्रायलमध्ये राहतात.

भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.
मोठी बातमी; CSMT, भायखळा येथील रेल्वे प्रवाशांचे हाल होणार, कारण...
मोठी बातमी; CSMT, भायखळा येथील रेल्वे प्रवाशांचे हाल होणार, कारण....
सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल
सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल.
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?.
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची..
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची...
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?.
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?.
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा
शिवनेरी सुंदरीवरून रोहित पवार भडकले; एसटीच्या नव्या अध्यक्षांवर निशाणा.