Hit And Run Rule | कुठे जन्मठेप तर कुठे थेट देहदंड! अपघात करुन पळणाऱ्यांना अशी आहे शिक्षा

Hit And Run Rule | भारतात हिट अँड रन प्रकरणात नवीन कायद्याने काहूर माजले. ट्रक चालकांनी संप पुकारला. देशातील दळणवळण व्यवस्थेपासून ते मार्केटपर्यंत सर्वांनाच फटका बसला. केंद्र सरकार आणि वाहतूक संघटनांमध्ये बोलणी झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. कोणत्या देशात काय आहे हिट अँड रन प्रकरणात शिक्षा?

Hit And Run Rule | कुठे जन्मठेप तर कुठे थेट देहदंड! अपघात करुन पळणाऱ्यांना अशी आहे शिक्षा
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 3:41 PM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2024 : Hit And Run प्रकरणात केंद्र सरकारने कडक कायदा करताच देशभरातील ट्रक, टँकर चालकांनी चक्काजाम केला. भारतीय न्यायिक संहितेनुसार, याप्रकरणात चालकाला 10 वर्षांचा तुरुंगवास, 9 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते अपघाताचे प्रकार भारतात सर्वाधिक असून त्यात मृत्यूचा आकडा पण भयावह आहे. रस्त्यावर बेदकारपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या कमी नाही. जड वाहनांच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. प्रत्येक देशात हिट अँड रनची शिक्षा वेगवेगळी आहे. काही ठिकाणी मृत्यूदंड तर जन्मठेपेच्या पण शिक्षा आहे.

कोणत्या देशात काय शिक्षा

  1. ऑस्ट्रेलियात कडक कायदे- ऑस्ट्रेलियातील कायद्यानुसार, अपघात झाल्यास वाहन चालकाने घटनास्थळावर हजर राहावे. अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. यासंबंधी विशेष कायदा आणि व्यवस्था करण्यात आली आहे. रस्ते अपघातानंतर वाहन चालकाला काही अंक देण्यात येतात. त्यातंर्गत चालकाला दंड आणि इतर शिक्षा होतात. त्याचा वाहन परवाना रद्द होतो.
  2. बांगलादेशात मृत्यदंड – बांगलादेशातील वाहन अधिनियम, 1927 नुसार, अपघात झाल्यानंतर वाहन चालकाने पळून जाता कामा नये. पोलीस येईपर्यंत त्याने थांबणे आवश्यक आहे. या अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास अथवा त्याचा मृत्यू ओढावल्यास शिक्षेची तरतूद आहे. चालकाला लागलीच अटक करण्यात येते. परिस्थितीनुसार मृत्यूदंडाची शिक्षा पण ठोठावल्या जाऊ शकते.
  3. हे सुद्धा वाचा
  4. कॅनाडामध्ये पाच वर्ष, जन्मठेपेची शिक्षा – कॅनाडात हिट अँड रन प्रकरणात कायद्यानुसार शिक्षा होते. यामध्ये 5 वर्षांपासून तुरुंगवास ते त्यापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे. अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास अथवा त्याचा मृत्यू झाल्यास 10 वर्षांची शिक्षा, दंडच नाही तर जन्मठेपेची शिक्षा होते. कॅनडामध्ये कारचा विमा बंधनकारक आहे.
  5. चीनमध्ये 7 वर्षांपर्यंतची शिक्षा – चीनमध्ये हिट अँड रन प्रकरणात वाहकाचा परवाना रद्द करण्यात येतो. त्याला आयुष्यभरासाठी वाहन चालविण्यास प्रतिबंध घालण्यात येतो. 1997 मधील नवीन कायद्यानुसार, अपघातात एखादा गंभीर जखमी झाल्यास अथवा मृत्यू ओढावल्यास 3 ते 7 वर्षांचा तुरुंगवास होतो.
  6. न्युझीलंडमध्ये मोठा दंड, 5 वर्षांची शिक्षा – न्युझीलंडमध्ये अपघात प्रकरणातील दोषी वाहकाने घटनास्थळीच थांबणे आवश्यक आहे. जर वाहकाने घटनास्थळावरुन पोबारा केला तर 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास वा 4,500 डॉलरचा दंड होऊ शकतो. कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत त्याला वाहन चालवता येत नाही. रस्ते अपघातात कोणाचा बळी गेला तर 5 वर्षांची शिक्षा वा 20,000 न्युझीलंड डॉलरचा दंड भरावा लागतो. त्याचा वाहन परवाना रद्द होतो.
  7. दक्षिण कोरियात मृत्युदंड – दक्षिण कोरियात हिट अँड रन हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. रस्ते अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला अथवा चालक फरार झाला तर त्याला 5 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि मोठ्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येते. त्याचे आयुष्य तुरुंगातच जाते. अपघातात कोणाचा मृत्यू न झाल्यास कमी शिक्षा होते. पण एका कलमाप्रमाणे येथे मृत्यूदंडाची पण तरतूद आहे.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.