Hassan Nasrallah : हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा ज्या बंकर बस्टर बॉम्बने झाला, तो किती शक्तीशाली?

Hassan Nasrallah : इस्रायलने शुक्रवारी आपला सर्वात मोठा शत्रू हसन नसरल्लाहचा खात्मा केला. तो हिज्बुल्लाह या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. हसन नसरल्लाहला संपवण्यासाठी इस्रायलने एका खास अस्त्राचा वापर केला. इस्रायलने जो बॉम्ब वापरला तो किती शक्तीशाली आहे, जाणून घ्या.

Hassan Nasrallah :  हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा ज्या बंकर बस्टर बॉम्बने झाला, तो किती शक्तीशाली?
Air strike
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 11:48 AM

इस्रायलने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा खात्मा झाला. इस्रायलने लेबनानची राजधानी बेरुतमध्ये एअर स्ट्राइक केलं. एकापाठोपाठएक इमारतींना टार्गेट केलं. यात नसरल्लाहचा मृत्यू झाला. या इमारतीतील एक बंकरमध्ये हिज्बुल्लाहच मुख्यालय होतं. त्याच इमारतीतून नसरल्लाह इस्रायलवर हल्ल्याच प्लानिंग करत असताना एअर स्ट्राइक झाला. नसरल्लाहला मारण्यासाठी इस्रायलने ज्या बॉम्बचा वापर केला, त्याची आता चर्चा सुरु झालीय.

इस्रायलने नरसल्लाहला मारण्यासाठी ज्या ताकदवर मिसाइल बॉम्बचा वापर केला, त्याचं नाव आहे, बंकर बस्टर GBU-72 बॉम्ब. मोठ्यात मोठा सर्वात सुरक्षित बंकरही क्षणार्धात उद्धवस्त करण्याची या बॉम्बची ताकद आहे. स्वत: इस्रायलने हा बॉम्ब बनवलेला नाही. अमेरिकेने त्यांना दिला आहे. इस्रायलने पहिल्यांदा कुठल्या ऑपरेशनसाठी सर्वात शक्तीशाली बॉम्बचा वापर केला असं म्हटलं जातय. 2021 मध्ये या बॉम्बची निर्मिती करण्यात आली होती.

GBU-72 बंकर बस्टर बॉम्बच वैशिष्टय

GBU-72 या बंकर बस्टर बॉम्बची वर्ष 2021 मध्ये निर्मिती करण्यात आली होती.

हे एक अत्याधुनिक बंकर बस्टर अस्त्र आहे.

खासबाब म्हणजे GBU-72 मध्ये 2200 किलोग्रॅम विस्फोटक भरलेलं असतं.

या बॉम्बमध्ये बंकरसह संपूर्ण इमारत नष्ट करण्याची ताकद आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात संपूर्ण 6 इमारती नष्ट झाल्या. त्या ठिकाणी ढिगारा दिसत आहे.

बंकर बस्टर बॉम्ब लॉन्च झाल्यानंतर जमिनीत खोलवर घुसतो.

या बॉम्बचा लगेच स्फोट होत नाही. जमिनीत 100 फूट खोलवर घुसल्यानंतर स्फोट होतो.

आधी कॉन्क्रीट वर GBU-72 च प्रायमरी वॉरहेड फुटतं.

ब्लास्टनंतर सेकेंडरी आणि मेन वॉरहेड ट्रिगर होतं.

याच्या मेन वॉरहेडमध्ये 6 फुट मोठा कॉन्क्रीटचा थर आतपर्यंत भेदण्याची क्षमता आहे.

क्षणाचाही विलंब न लावता बेरुतवर एअर स्ट्राइक

इस्रायली हेरांना बेरुतमधील नसरुल्लाहच लोकेशन मिळालं. त्यांनी लगेच मोसादच्या हेड क्वार्टरला याची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न लावता बेरुतवर एअर स्ट्राइकचा निर्णय घेण्यात आला. इस्रायली डिफेंस फोर्सेसनी एअर स्ट्राइकसाठी अमेरिकेला गेलेले पंतप्रधान नेतन्याहू यांची परवानगी घेतली. पीएमकडून ग्रीन सिग्नल मिळताच एअर स्ट्राइक करण्यात आला.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.