..जाता जाईना कोरोना! कोविडचा प्रभाव अजून 2 दशकं, आरोग्य संघटनेचा नवा अलर्ट

अफ्रिका खंडातील राष्ट्रांत लसीकरणाचे प्रमाण अद्याप 23 टक्केच आहे. लसीकरणातील तफावत कमी करणं डब्लूएचओची प्राथमिकता आहे.

..जाता जाईना कोरोना! कोविडचा प्रभाव अजून 2 दशकं, आरोग्य संघटनेचा नवा अलर्ट
जागतिक आरोग्य संघटना
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:15 PM

नवी दिल्ली : कोविड विषाणूबाबत नवनवीन संशोधन जगासमोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गोटातून कोविड विषाणूच्या व्याप्तीबद्दल नवा खुलासा करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी कोविडचा परिणाम दोन दशके कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. कोविड संसर्गाचा वेग मंदावला असला तरी कोविडचे दुष्पपरिणाम आगामी दोन दशके कायम राहतील असे डॉ. टेड्रोस यांनी सांगितले. WHO प्रमुखांनी प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना सतर्क केले आहे. कोविड प्रकोप अधिक काळ टिकल्यास प्रभाव देखील अधिक दिसून येईल अशी भीती डॉ.टेड्रोस यांनी व्यक्त केली आहे. कोविड विषाणूंचे नवे व्हेरियंट जगासमोर येत आहे. त्यामुळे जगभरातील राष्ट्रांसमोरच्या अडचणीत भर पडत आहे. कोविड निर्बंधाच्या व्याप्तीमुळे जगभरातील राष्ट्रांत निदर्शनेही केली जात आहे.

लसीकरणाची असमानता-

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी लसीकरणाच्या असामनतेवर भाष्य केलं आहे. जगभरातील एकूण लोकसंख्येच्या केवळ 42 टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लशींचे दोन डोस घेतले आहेत. गरीब राष्ट्रांत अद्याप पूर्ण क्षमतेने लसीकरण झालेले नाही. लशींच्या उपलब्धतेवर आर्थिक निधीची चणचण गरीब राष्ट्रांना जाणवत आहे. गरीब राष्ट्रांत पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोविडवर प्रभावीपणे मात करता येईल असे डॉ.टेड्रोस यांनी म्हटले आहे.

टार्गेट लसीकरण-

अफ्रिका खंडातील राष्ट्रांत लसीकरणाचे प्रमाण अद्याप 23 टक्केच आहे. लसीकरणातील तफावत कमी करणं डब्लूएचओची प्राथमिकता आहे. केवळ कोविड प्रकोपामुळं जिविताचं रक्षणच नव्हे तर विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करण्याचे देखील उद्दिष्ट आहे. यापूर्वीच आरोग्य संघटनेने विषाणूच्या बदलत्या स्वरुपाला प्रतिकार करण्यासाठी लसींच्या निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचं यापूर्वीचं स्पष्ट केलं आहे. SARS-CoV-2 च्या काही व्हेरियंटवर लसीकरणातून मिळणाऱ्या अँटीबॉडीतून मात करता येणं शक्य असल्याचं आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

आरोग्य संघटनेचा ग्रीन सिग्नल:

आरोग्य संघटनेने जागतिक स्तरावर अनेक लशींना मान्यता दिली आहे. यामध्ये भारतीय बनावटीच्या लशींचा देखील समावेश होतो. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोविड-19 प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मान्यता मिळाल्यानंतर अमेरिकेने आपल्या परदेशी प्रवासी धोरणात सुधारणा केली होती. ही भारतीय प्रवाशांसाठी मोठा दिलासादायक बाब ठरली होती. कारण अनेक भारतीय प्रवासी भारतीय बनावटीची कोवॅक्सिन लस घेतल्यामुळे त्यांना अमेरिकेत प्रवेशाला बंदी असल्याने भारतात अडकले होते.

संबंधित बातम्या :

 शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायक ठरते सुपारी, जाणून घ्या सुपारीचे अनेक फायदे

अक्कल दाढ आल्यावर खरंच अक्कल येते? अक्कल दाढेच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या!

त्वचेवरील तीळ काढण्याच्या प्रयत्नात असाल तर थांबा! तसं केलं कॅन्सरचा धोका? जाणून घ्या काय करावं

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.