कोण आहे मुल्ला बरादर ज्याचं अफगाण राष्ट्रपती म्हणून नाव घेतलं जातंय? आताचा राष्ट्रपती नेमका कुठे पळाला?
विशेष म्हणजे सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते ताजकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत.
अखेर तालिबाननं जवळपास 20 वर्षानंतर अफगाणिस्तानच्या सत्तेवर पूर्णपणे ताबा मिळवलाय. तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनही ताब्यात घेतलंय. मुल्ला अब्दूल गनी बरादरचं नाव आता नवा राष्ट्रपती म्हणून जवळपास निश्चित मानलं जातंय. फक्त औपचारीक घोषणा बाकी असल्याचं आंतरराष्ट्रीय न्यूज संस्थांनी वृत्त दिलंय. विशेष म्हणजे सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते ताजकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत.
कोण आहे मुल्ला अब्दूल गनी बरादर?
मुल्ला अब्दूल गनी बरादर हा तालिबानच्या राजकीय विंगचा प्रमुख आहे. दोह्यात जी तालिबानसह आंतरराष्ट्रीय चर्चेच्या फेऱ्या झाल्यात त्यातही बरादरची महत्वाची भूमिका राहिलीय. मुल्ला ओमरसह तालिबानची स्थापना करण्याचं श्रेय हे बरादरकडे जातं.
रशिया-पाकिस्तान कनेक्शन
तालिबानची ज्यावेळेसही चर्चा होते, तेव्हा मुल्ला अब्दूल गनी बरादर (Mullha Abdul Ghani Baradar) चे नाव चर्चेत असतेच. बरादरचा जन्म आणि वाढ ही कंदहारची. याच कंदहारमध्ये तालिबानचाही जन्म झाला. 1970 ला सोव्हिएत यूनियननं अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली. त्या एका घटनेनं अफगाण लोकांच्या एका पिढीचं आयुष्य कायमचं बदललं. असं मानलं जातं की, त्या एका घटनेमुळे अफगाणिस्तानच्या प्रत्येक व्यक्तीवर कायमचा परिणाम झाला. त्यापैकीच एक आहे मुल्ला अब्दूल गनी बरादर. एका डोळ्यानं अधू असलेल्या मुल्ला ओमरसोबत खांद्याला खांदा लावून मुल्ला अब्दूल गनी बरादर लढल्याचं सांगितलं जातं. सोव्हिएत यूनियनं अफगाणिस्तानमधून माघार घेतली आणि यादवी माजली. त्याच अस्थिरता, गोंधळ, भ्रष्टाचाराच्या वातावरण मुल्ला ओमर आणि मुल्ला अब्दूल गनी बरादरनं तालिबानची स्थापना केली. 2010 साली मुल्ला अब्दूल गनी बरादरला पाकिस्तानच्या कराचीत अटक करण्यात आली होती आणि 2018 मध्ये त्याची सुटका केली गेली. तेही अमेरीकेच्या दबावानंतर.
वेळेचं उलटं चक्र
ज्या तालिबानसोबत चर्चा करुन डील करण्याचा प्रयत्न अशरफ गनी करत होते, त्याच तालिबानचा नेता मुल्ला अब्दूल गनी बरादर हा 2001 मध्ये तत्कालीन अफगाण राष्ट्रपती हमीद करजाई यांच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आले होता. अर्थातच तो प्रस्ताव किंवा तालिबानची कुठलीच गोष्ट त्यावेळेस मान्य केली गेली नाही. आता त्याच मुल्ला अब्दूल गनी बरादरकडे पळ काढलेल्या राष्ट्रपतींना डीलसाठी मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. पाकिस्ताननं मुल्ला अब्दूल गनी बरादरला आठ वर्ष जेलमध्ये ठेवलं. अमेरिकेनं दबाव आणून त्याला सोडवलं आणि कतारला पाठवलं. तिथं तालिबानच्या राजकीय शाखेचा प्रमुख म्हणून बरादरच्या नावाची घोषणा केली गेली. त्यानेच दोह्यात चर्चेच्या फेऱ्या पूर्ण केल्या. तालिबानला पुन्हा अफगाणिस्तानच्या सत्तेवर आणलं.
अशरफ गनीवर अफगाण जनता नाराज
सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे ताजिकिस्तानला(Afghan president fled to Tajikistan) पळून गेलेत. अमेरीकेनं त्यांची तशी सोय केल्याचे रिपोर्ट आहेत. विशेष म्हणजे कालपर्यंत अशरफ गनी हे तालिबानचा पाडाव करण्याचं जनतेला टीव्हीवर आश्वासन देत होते. पण टीव्हीवर दाखवलेली त्यांची टेप ही आधीच रेकॉर्ड केली असल्याचं आता उघड झालंय. अफगाण जनतेला अशरफ गनी यांनी पळून जाणं फार रुचलेलं नाही. गनी यांनी अफगाण जनतेचा विश्वासघात केला आणि इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही अशा प्रतिक्रिया अफगाण जनता व्यक्त करतीय. फक्त राष्ट्रपतीच नाही तर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीही देश सोडून निघून गेलेत.
“We woke up this morning to the Taliban white flags all over the city.”
The Taliban’s capture of Jalalabad effectively leaves Kabul as the last major urban area under government control https://t.co/o6h7POQ8HQ pic.twitter.com/GfXadVywL0
— Al Jazeera English (@AJEnglish) August 15, 2021
Afghan President Ghani flees country as Taliban enters Kabul https://t.co/PpuQN4hfcp
— Al Jazeera English (@AJEnglish) August 15, 2021
(Who is Afghanistan’s new president, know all about Mullah Abdul Ghani Baradar)