गूढ आजाराने वाढवल्या चिंता, कोरोनापेक्षा 20 पट प्राणघातक; WHO ने बोलवली तातडीची बैठक

कोरोनानंतर आता आणखी एका नव्या आजाराने जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता एका गुढ आजाराने आरोग्य यंत्रण चिंतेत आहेत. हा आजारा काय आहे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करता येईल यासाठी डब्लुएचओने दाओसमध्ये तातडीची बैठक बोलवली आहे.

गूढ आजाराने वाढवल्या चिंता, कोरोनापेक्षा 20 पट प्राणघातक; WHO ने बोलवली तातडीची बैठक
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 9:28 PM

मुंबई : कोरोनानंतर आता डिसीज एक्स नावाच्या आजाराने पुन्हा एकदा जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. तज्ञांनी हा आजारा कोरोना पेक्षा 20 पटीने घातक असल्याचे म्हटले आहे. याचा धोका लक्षात घेता WHO ने देखील यावर गंभीर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत देखील याचा समावेश केला गेला होता. डब्ल्यूएचओच्या संचालकांनी देखील याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा आजार कशामुळे होतो आणि याचा परिणाम किती घातक असू शकतो हे अजून पुढे आलेले नाही. पण तो भविष्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे.

नव्या रोगाबाबत बैठक

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2017 मध्येच या आजाराबाबत सावध भूमिका घेतली होती. SARS आणि Ebola या आजारांसह X वरही चाचण्या घेतल्या जात होत्या. WHO या आजाराबाबत आता तातडीची बैठक घेणार आहे. दाओसमध्ये यावर चर्चा केली जाणार आहे. ब्राझीलचे आरोग्यमंत्री आणि भारताचे अपोलो हॉस्पिटल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष प्रीता रेड्डी हे देखील या बैठकीला जाणार आहेत. डब्लूएचओचे अध्यक्ष याचे नेतृत्व करणार आहेत.

आव्हाने पेलण्यासाठी तयार

या महामारीपासून जगाला वाचवण्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी असे डब्ल्यूईएफने म्हटले आहे. येणारी आव्हाने पेलण्यासाठी तयार राहण्याची आणि आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याची गरज आहे. यावर लस, औषधे आणि चाचण्या याबाबत आताच पाऊले उचलण्याची देखील आवश्यकता आहे. वन्यजीवांमध्ये असलेले विषाणू मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. कारण हा विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरण्याची भीती असते.

वेळीच पाऊले उचलले असती तर

डब्ल्यूएचओने असेही म्हटले की, या आजारावर ते लक्ष ठेवून आहेत. 2014 ते 2016 दरम्यान आफ्रिकेत इबोलाची साथ पसरली होती. त्यावेळी केले गेलेले संशोधन हे एक्स रोगाच्या उपयुक्त ठरु शकतील. इबोलामुळे 11 हजार लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे वेळीच पाऊले उचलले असती तर इतके मृत्यू झाले नसते. डब्ल्यूएचओने यानंतर अशा आजारांची ओळख करण्यास सुरुवात केली. भविष्यात ज्या आजारांचा किंवा रोगांचा धोका आहे. त्याची तयारी आधीपासूनच करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.