रशियाने यूक्रेन (Ukraine) वर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक लोक मृत्यमुखी पडले. या संकट समयी युक्रेनचे लोक यूलिया तेमोसेंकोवा (Yulia Tymoshenko) यांची आठवण काढत आहे. युलिया यूक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान(First Prime minister) होत्या. त्या नेहमी रशियाच्या विरोधात बोलत असायच्या. यूक्रेनमधील लोकांचे असे म्हणणे आहे की, देशावर हल्ला करणारा रशिया देश यूलिया तेमोसेंकोवा यांना कधीच घाबरवू शकला नाही. सध्या युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीमध्ये तेथील लोकांचे म्हणणे असे आहे की, जर आज देशाची सत्ता यूलीया यांच्या हाती असती तर देशांमध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती. नेमक्या यूलिया तेमोसेंकोवा या कोण होत्या ? यांनी युक्रेनमधील लोकांचा विश्वास कशाप्रकारे जिंकला. युलीया यांना ग्रीन क्वीनच्या नावाने का ओळखले जायचे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान या पदाचा कार्यभार सांभाळताना युलिया यांनी नेहमी रशियाला तीव्र शब्दांमध्ये उत्तर दिले होते. युलिया यांनी कोणतेही युद्ध न करता “एक इंच जमीन” सुद्धा रशियाला देण्यास तयार नव्हत्या या त्यांच्या कठोर स्वभावाला रशिया सुद्धा एकेकाळी घाबरायचा. युक्रेन च्या यशस्वी बिझनेस वुमन म्हणून यांची ओळख होती, यांचा सर्वात मोठा गॅस व्यवसाय देखील होता म्हणूनच युलिया यांना गॅस क्वीन या नावाने ओळखले जायचे.
यशस्वी बिजनेस महिला म्हणून स्वतःला सिद्ध केल्यानंतर युलिया यांनी राजकारणात क्षेत्रामध्ये प्रवेश केला. युलिया यांना लोकांचा प्रचंड प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान पद म्हणून त्यांनी भूषविले. 2007 पासून ते 2010 पर्यंत युक्रेनच्या पंतप्रधान राहिल्या. युलिया यांनी आपली कार्यशैली आणि कर्तृत्व यामुळे युक्रेन मधील लोकांचे मन जिंकले होते तसेच देशासाठी लढणारी एक प्रतिमा सुद्धा लोकांच्या मनात तयार झाली होती.
यूक्रेन मध्ये 2004 साली झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये रशिया समर्थक विक्टर यूश्नकोव यांचा विजय झाला होता. या विजयानंतर यूलिया सोबतच अन्य विरोधी नेत्यांनी विक्टरवर निवडणुकीमध्ये गोंधळ तसेच भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील लावला होता. या विरोधमुळे “ऑरेंज रिवोल्यूशन” ची सुरुवात झाली होती. विक्टर यांना करण्यासाठी सर्वात पुढे यूलिया असायच्या. त्यांच्या पक्षाचा जो झेंडा होता, त्याचा रंग ऑरेंज होता. या कारणामुळेच या विरोधाला “ऑरेंज रिव्होल्यूशन” असे म्हटले गेले. युलिया यांनी कधीच आपले पाऊल मागे घेतले नाही याचा परिणाम असा झाला की, रशिया समर्थक राष्ट्रपती विक्टर यांना देश सोडून जावे लागले.
इतर बातम्या
रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत 160 अब्ज पौंड संपत्तीचे मालक; अलिशान कारची संख्या ऐकून थक्क व्हाल