नवं संकट: जगावर आता स्पॅनिश फ्लूचा धोका, 100 वर्षांपूर्वी 50 कोटी जणांचा बळी
आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वरिष्ठ वैज्ञानिकांनी जगाला एक इशारा दिलाय. यानुसार, आगामी काळात जगभरात ‘स्पॅनिश फ्लू’चं (Spanish Flu) आगमन (Return) होऊ शकतं.
वॉशिंग्टन : संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीचा कहर सरु आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) मोहिम सुरु आहे. या संकटाशी सामना सुरुच आहे तोच आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वरिष्ठ वैज्ञानिकांनी जगाला एक इशारा दिलाय. यानुसार, आगामी काळात जगभरात ‘स्पॅनिश फ्लू’चं (Spanish Flu) आगमन (Return) होऊ शकतं. जवळपास 100 वर्षांपूर्वी या फ्लूने 5 कोटी लोकांचे जीव घेतले होते. त्याचमुळे WHO च्या वैज्ञानिकांनी इंफ्लूएंजाबाबत इशारा दिलाय. तसेच पुढील साथीरोगाचं कारण स्पॅनिश फ्लू ठरु शकतो असा अंदाज वर्तवलाय (WHO scientist warn Spanish flu pandemic risk in Future may return).
ब्रिटिश वृत्तपत्र ‘द सन’मधील वृत्तानुसार, “WHO च्या ‘ग्लोबल इंफ्लूएंजा सर्विलान्स अँड रिस्पाँस सिस्टम’चे वरिष्ठ सदस्य डॉ. जॉन मॅककोली (Dr John McCauley) यांनी हा सामान्य फ्लू विषाणूंमध्ये बदल करुन अधिक घातक होऊ शकतो.” एकिकडे जग कोविड-19 साथीरोगाचा सामना करत आहे. दुसरीकडे संशोधक भविष्यात साथीरोग तयार होऊ शकतात अशा विषाणूंचा शोध घेत आहेत. जेणेकरुन त्याचा प्रसार होण्याआधीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील. डॉ मॅककोली यांनी खुलासा केलाय की सर्वाधिक काळजी सामान्य तापाची (फ्लू) आहे. या फ्लूचा नवा स्ट्रेन भविष्यातील साथीरोगाचं कारण ठरु शकतो.
नागरिकांमधील कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ती काळजीचं कारण
डॉ जॉन मॅककोली म्हणाले, “शारीरिक अंतर ठेवणं, हात धुणं या कोरोनावरील उपाययोजनांमुळे एक शतकांपर्यंत हे फ्लू जास्त पसरु शकणार नाही. मात्र, कोरोनानंतर जगात हंगामी तापाच्या विषाणूंचा धोका वाढेल. नागरिकांची कमी होत चाललेली रोगप्रतिकारक शक्ती यामागील मोठं कारण आहे. ब्रिटेनला याबाबत आधीच इशार देण्यात आलाय. तेथे पुढील हिवाळ्यात देशातील फ्लू रुग्णांचं प्रमाण बरंच वाढेल. या वर्षी मात्र हा फ्लू जवळपास गायब होता.”
स्पॅनिश फ्लू कोठून आला?
1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूमुळे जगातील एक तृतियांश लोकांना याचा संसर्ग झाला होता. पक्षांमुळे या फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे जगभरातील 5 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही संख्या पहिल्या महायुद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच डॉ. मॅककोली यांनी आगामी काळात या फ्लूचा सामना करण्यास तयार राहण्याचा इशारा जगाला दिलाय.
हेही वाचा :
पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण असेल तर मग लसीकरणावर 35 हजार कोटींचा खर्च का? : IMA
China | चीनने पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं, WHO ची टीम तातडीने वुहानला जाणार
व्हिडीओ पाहा :
WHO scientist warn Spanish flu pandemic risk in Future may return