Gaza Hospital Attack | 500 जणांचा बळी गेलेल्या रुग्णालय हल्ल्याशी इस्रायलचा संबंध नाही, हे घ्या पुरावे

Gaza Hospital Attack | कुठल्या आधारावर अमेरिकेने इस्रायलला निरपराध ठरवलं, ते जाणून घ्या. जगभरातून या घटनेचा निषेध होतोय. एकाचवेळी 500 निरपराध नागरिकांनी प्राण गमावले.

Gaza Hospital Attack | 500 जणांचा बळी गेलेल्या रुग्णालय हल्ल्याशी इस्रायलचा संबंध नाही, हे घ्या पुरावे
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 11:01 AM

जेरुसलेम : गाझातील एका रुग्णालयावर मंगळवारी रॉकेट हल्ला झाला. यात जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल दौऱ्यावर येणार होते. बरोबर त्याच्या एकदिवस आधी हा हल्ला झाला. पॅलेस्टाइनने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलय. पॅलेस्टाइनच्या अथॉरिटीने इस्रायली संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते हनन्या नफ्ताली यांच टि्वट शेयर केलय. “इस्रायलने रुग्णालयावर हल्ला केला, ज्यात हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले” असं स्पष्टपणे म्हटलं होतं. इस्रायलने शेअर केलेले व्हिडिओ सुद्धा डिलीट करण्यात आले. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, मागून येणार रॉकेट रुग्णालयावर कोसळलं. अमेरिकेने सूत्रांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारावर इस्रायलला रुग्णालय हल्ल्याच्या आरोपातून मुक्त केलं आहे.

अमेरिकेने पुराव्यांच्या आधारावर इस्रायलला क्लीन चीट दिली आहे. बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारला रुग्णालय हल्ल्यासाठी जबाबदार धरलेलं नाही. गाझा रुग्णालय हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार नाहीय, असं बायडेन प्रशासनाने म्हटलय.

रॉकेट टार्गेटपासून भरकटल्याने रुग्णालयावर जाऊन पडलं, हे हमासचे दहशतवादी सुद्धा मान्य करतात, असा दावा अमेरिकेने केला आहे. हमास आणि पॅलेस्टाइन इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यामधील संभाषणाची ऑडियो रिकॉर्डिंग इस्रायलने जारी केलीय.

पॅलेस्टाइनकडून इस्रायलवर आरोप होत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रुग्णालयावर हल्ला कसा झाला, त्याची थिअरी मांडली. गाझामधून ऑपरेट करणाऱ्या इस्लामिक जिहादला जबाबदार ठरवलं. जगभरातून रुग्णालयावरील या रॉकेट हल्ल्याचा निषेध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दु:ख व्यक्त केलं. या हल्ल्यामागे जे कोणी आहेत, त्यांना जबाबदार धरलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत बॉम्ब वर्षाव सुरु आहे. हमासच्या तळांना लक्ष्य केलं जातय. हमासकडूनही प्रतिहल्ला केला जातोय. हमासकडून ज्या रॉकेट्सचा वापर केला जातो, त्यांचा दर्जा तितका चांगला नसतो. 75 हजार ते 1 लाखा दरम्यान त्यांची किंमत असते. त्यामुळे 20 ते 25 टक्के रॉकेट्स गाझा पट्टीतच कोसळतात. ज्यात पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी जातो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.