हमास नेत्याला ठार करण्यासाठी इस्रायलने इतर देशांच्या ऐवजी इराणचीच निवड का केली?

इस्रायलने आतापर्यंत हमासच्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हमासचे अनेक नेते इस्रायलने ठार केले आहे. त्यानंतर आता हमासच्या प्रमुखालाच इस्रायलने ठार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या देशात जावून इस्रायलने हे ऑपरेशन कसे पार पाडले जाणून घ्या.

हमास नेत्याला ठार करण्यासाठी इस्रायलने इतर देशांच्या ऐवजी इराणचीच निवड का केली?
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 5:25 PM

इस्रायल जे बोलतो ते करतोच असं म्हटलं जातं. इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हमासचा खात्मा करण्याची शपथ इस्रायलने घेतली होती. इस्रायलने म्हटलं होतं की, हे युद्ध हमासने सुरु केलं होतं. पण हे युद्ध आम्ही संपवू. त्यामुळे इस्रायलने हमासच्या अनेक ठिकाणांना याआधी लक्ष्य करत हमासच्या नेत्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये आता आणखी एक नेत्याचा मृत्यू झाली आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये हमासचा नेता इस्माईल हानियाची हत्या करण्यात आलीये. हानिया हा तेहरानमधील एका अपार्टमेंटमध्ये होता. इराणच्या लष्कराने माहिती दिली की, हानियासोबत त्यांचा एक सुरक्षा रक्षकही मारला गेला आहे.हानियाच्या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचं बोललं जात आहे. इस्रायलने आधीच याची धमकी दिली होती. या हत्येनंतर आता हमासने देखील इस्रायला धमकी दिली आहे.

इस्माईल हनिया इराणमध्ये काय करत होता?

इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधीसाठी इस्माईल हानिया तेहरानला पोहोचला होता. इस्माईल हानियाला इराणने राज्य पाहुण्याचा दर्जा दिला होता. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी अनेक देशांचे नेते तेहरानमध्ये पोहोचले आहेत. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला इस्माईल हनिया नक्की जाईल हे इस्रायलला आधीच माहित होतं. त्यामुळे इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी इस्माईल हनियावर लक्ष ठेवले. त्यानंतर त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ठार केले. गाईडेड क्षेपणास्त्राद्वारे हानियाच्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे तेहरानमध्ये इस्माइल हानियाचा मृत्यू झाला.

इस्माइल हानियाला पहाटे 02:00 वाजता ठार केले. पण हा हल्ला कसा झाला याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता प्रश्न असा पडतो की, हानियाला ठार करण्यासाठी इराणचीच निवड का केली. इतर देशात त्याला ठार केले असते तर त्याचे काय परिणाम झाले असते. इस्रायलने हनियाला ठार करण्यासाठी कोणती पद्धत वापरली.

इस्रायलने हल्ल्यासाठी इराणची निवड का केली?

इस्माईलने हानियाला मारण्यासाठी इराणचीच निवड केली. हनिया हा बहुतांश काळ कतारमध्ये राहतो. कतारची राजधानी दोहा येथे हमासचे राजकीय कार्यालय देखील आहे. ज्याचा प्रमुख हानिया होता. पण कतारमध्ये हानियावर हल्ला करण्याचे धाडस इस्रायल करु शकत नव्हता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आखाती देशांपैकी कतार हा देश अमेरिकेच्या सर्वात जवळचा आहे. दुसरं कारण असे की, कतारवर हल्ला करण्यासाठी इस्रायलला इराणपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली असती. याशिवाय त्याचे इतर परिणाम देखील झाले असते. या परिणामांचा इस्रायलवर राजकीय प्रभाव पडला असतो. कतारमध्ये जर हनियाला ठार केले असते तर अमेरिकाही इस्रायलच्या विरोधात गेला असता. हानिया हा तुर्कियेला देखील जात असे. पण तिथे देखील त्याला ठार करता आले नसते. कारण तुर्किये हा नाटोचा सदस्य देश आहे. अशा स्थितीत इस्त्रायलला तुर्कियेमध्येही लक्ष्य करणे कधीच शक्य झाले नसते.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.