पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तीन दिवसीय दौऱ्यासाठी फ्रान्स आणि संयुक्त अरब अमीरातसाठी रवाना झाले. पंतप्रधान मोदी आधी फ्रान्सला पोहचले. नंतर संयुक्त अरब अमीरातीसाठी निघतील.
जगातील सर्वात मोठा मॉल दुबईत आहे. दुबईतील मॉल १२ मिलीयन वर्ग मीटर पसरला आहे. त्यात १२०० स्टोर आहेत. २६ सिनेमा स्क्रीनच्या मॉलमध्ये १२० पेक्षा अधिक कॅफे आहेत.
जगातील सर्वात मोठा अॅक्वेरीयम दुबईत आहे.अॅक्वेरीयम टँकच्या नावाने ओळखले जाते. याची क्षमता एक कोटी लीटर पाणी आहे. अॅक्वेरीयममध्ये ३३ हजारांपेक्षा जंतूच्या २०० प्रजाती आहेत.
दुबईमध्ये अशी फ्रेम लावण्यात आली आहे जी जगातील सर्वात उंच पिक्चर फ्रेम नावाने ओळखले जाते. ही फ्रेम ४९२ फूट उंच आहे.
दुबईत काही इंडोर स्कीईंग प्रसिद्ध आहेत. येथे गेल्यानंतर थंड प्रदेशात गेल्यासारखं भासते.