AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या का केली? मारेकऱ्याने  आईचे नाव घेत सांगीतलेल्या कारणामुळे पोलिसही हडबडले

आईच्या दान करण्याच्या सवयीमुळे माझ्यावर आबे यांची हत्या करण्याची वेळ आल्याचे तेत्सुया यामागामी याने पोलिसांना सांगीतले . एकेकाळी करोडोंच्या संपत्तीचा वारस असणारा तेत्सुया यामागामी आईच्या दान करण्याच्या सवयीमुळे इतका गरीब झाला की त्याच्यावर अन्नासाठी भिक मागण्याची वेळ आली .

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या का केली? मारेकऱ्याने  आईचे नाव घेत सांगीतलेल्या कारणामुळे पोलिसही हडबडले
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 6:48 PM

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे(Former Japanese Prime Minister Shinzo Abe)यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 8 जुलै रोजी त्यांच्या हत्येचे वृत्त प्रसारीत झाले आणि जपानसह संपूर्ण जग हादरले. भारताशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते. पोलिसांनी तात्काळ शिंजो आबे यांना गोळ्या घालणाऱ्या आरोपीला अटक केली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिंजो आबे यांचा मारेकरी तेत्सुया यामागामी(Tetsuya Yamagami) याने हत्येबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. शिंजो आबे हे माझे शत्रू नव्हते. मात्र, माझ्या आईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असल्याचा दावा या मारेकऱ्याने केला आहे. आबे याची हत्या करण्यामागे मारेकऱ्याने पोलिसांना सांगीतलेले कारण अत्यंत धक्कादायक आहे.

आबे यांची हत्या कशी झाली?

8 जुलै रोजी आबे यांची नारा शहरात प्रचारसभा आयोजिण्यात आली होती. त्याचवेळी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. तेत्सुया यामागामी या हल्लेखोराने आबे यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आबे जागीच कोसळले. आबे यांना हेलिकॉप्टरद्वारे तातडीने नारा वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. अखेरीस सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हल्लेखोर यामागामीने डबल बॅरेलची हँडमेड गनने आबे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली.

हल्लेखोराचा पोलिसांजवळ खळबळजनक खुलासा

आईच्या दान करण्याच्या सवयीमुळे माझ्यावर आबे यांची हत्या करण्याची वेळ आल्याचे तेत्सुया यामागामी याने पोलिसांना सांगीतले . एकेकाळी करोडोंच्या संपत्तीचा वारस असणारा तेत्सुया यामागामी आईच्या दान करण्याच्या सवयीमुळे इतका गरीब झाला की त्याच्यावर अन्नासाठी भिक मागण्याची वेळ आली .

युनिफिकेशन चर्चमुळे माझं आयुष्य बरबाद झालं

युनिफिकेशन चर्चमुळे माझं आयुष्य बरबाद झाल्याचे तेत्सुया याने सांगीतले. या चर्चची स्थापना 1954 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाली होती. 1980 च्या दशकापासून या चर्चवर आपल्या भक्तांकडून लाखोंच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे. या चर्चमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याच्या आईने युनिफिकेशन चर्चला दिलेल्या मोठ्या देणगीमुळे त्याचे कुटुंब आणि जीवन नष्ट झाले असल्याचे त्याने असोसिएटेड प्रेसला लिहिलेल्या पत्रात आणि ट्विटमध्ये म्हंटले आहे. ॉ

लहानपणी वडिलांची हत्या

यामागामी 4 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची हत्या झाली. यानंतर त्याची आई युनिफिकेशन चर्चमध्ये सामील झाली. आईने भरपूर पैसा चर्चला दान करत होती. देणग्यांमुळे कुटुंबाचे दिवाळे निघाले. यामागामीला कॉलेज अर्धवट सोडावे लागले. त्याच्या भावाने देखील आत्महत्या केली.

चर्चच्या संस्थापकाच्या पत्नीला मारण्याची योजना होती

यामागामीने पोलिसांना सांगितले की त्याने चर्चच्या संस्थापकाची पत्नी हक जे हान मून हिच्या हत्येचा कट रचला होता. मात्र जपानमध्ये आलीच नाही. आबे माझे मुख्य शत्रू नव्हते. ते युनिफिकेशन चर्चच्या सर्वात प्रभावशाली समर्थकांपैकी एक होते यामुळे मी त्यांची हत्यातेल्याचे मारेकऱ्याने पोलिसांना सांगीतले.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.