सुनीता विल्यम्सला घेऊन जाणारे स्पेस शटल सुरक्षित उतरणार का?

नासाने दोन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाठवले होते. पण त्यांना परत आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेस शटलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अंतराळवीरांना परत आणण्यात अपयश आले. त्यामुळे आता फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे.

सुनीता विल्यम्सला घेऊन जाणारे स्पेस शटल सुरक्षित उतरणार का?
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 4:30 PM

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) घेऊन जाणारे बोईंगचे स्टारलाइनर स्पेस शटल पृथ्वीवर परतणार आहे. मात्र सुनीता आणि बुचशिवाय हे अंतराळयान पृथ्वीवर परतणार आहे. नासाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, स्टारलाइनर अंतराळयान भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री 3.30 वाजता ISS वरून खाली उतरण्यास सुरुवात करेल. सहा तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर त्याला न्यू मेक्सिकोमध्ये उतरवण्यात येणार आहे. अधिकृत प्रकाशनात, NASA ने सांगितले की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी कार्गो पॅकिंग पूर्ण केले आणि स्टारलाइनरची हॅच बंद केली, ज्यामुळे ते क्रूशिवाय निघण्यासाठी तयार झाले.

स्वयंचलित मोडवर परत येणार

नासाने सांगितले की स्पेस शटलचा परतीचा प्रवास स्वयंचलित मोडमध्ये असणार आहे. भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात बोईंगच्या स्टारलाइनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केले होते. परंतु उड्डाण दरम्यान, अंतराळ यानामध्ये अनेक समस्या उद्भवल्या, त्यानंतर नासाने या दोन्ही अंतराळवीरांना तेथेच थांबवणयाच्या निर्णय घेतला होता.

अंतराळ यानात तांत्रिक समस्या

मिळालेल्या माहितीनुसार, अंतराळ यानाला हेलियम लिकेजसह इतर समस्यांचा सामना करावा लागत होता, त्यानंतर अंतराळवीरांचा परतीचा प्रवास टाळण्यात आला होता. स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्यानंतर बुच आणि सुनीता अनेक महिन्यांपासून स्पेस स्टेशनमध्ये अडकले होते. नासाने नंतर स्पेसएक्स क्रू 9 अंतराळयानातून दोन अंतराळवीरांना परत आणण्याचा निर्णय घेतलाय. जे दोन अडकलेल्या अंतराळवीरांना फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परत आणेल.

स्टारलाइनरमधील तांत्रिक अडचणींमुळे ते अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या, NASA+ मध्ये ट्यून करून बोईंग स्टारलाइनर परत आणले जाईल. याशिवाय, नासाच्या ॲपवर आणि त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर किंवा नासाच्या वेबसाइटवरही हे प्रसारण पाहता येईल. पंरतू ते किती सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरते हे पाहावे लागणार आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.