महिलांवर बलात्कार होताय, बांग्लादेशमधील हिंदू मुलीनं पीएम मोदींकडे मागितली मदत, पत्र व्हायरल
बांगलादेशात शेख हसीना यांच्या पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. इतकेच नाही तर हिंदूंना देखील टार्गेट केले जात आहे. बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदेने म्हटले आहे की सोमवारपासून शेकडो हिंदू घरे आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे आणि मंदिरांचे नुकसान झाले आहे.
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आणि देश सोडल्यानंतर ही बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचाराच्या मागून अनेक देश लूटमार करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशमधील हिंदू लोकांना टार्गेट केले जात आहे. लोकांच्या घरात घुसून त्यांच्याकडून पैसे लुटले जात आहेत. घरात घुसून तोडफोड केली जात आहे. इतकंच नाही तर पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारले जात असल्याचं देखील कळतं आहे. या सर्व परिस्थितीबाबत सोशल मीडियावर एका हिंदू मुलीचं पत्र व्हायरल होत आहे. तिने भारताकडे मदत मागितली आहे. बांगलादेशातील १२वीत शिकणाऱ्या एका हिंदू विद्यार्थीनीने हे पत्र लिहिले आहे. स्पुतनिक इंडियाने हे पत्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ती मुलगी भारत सरकारकडे मदतीची मागणी करत आहे. या पत्रात असे लिहिले आहे की, देशात होत असलेल्या हिंसाचाराचे फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, परंतु जमिनीवर परिस्थिती खूपच वाईट आहे.
देशात हिंदूंना लक्ष्य करून हल्ले केले जात आहेत, ज्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. विशेषतः महिला आणि मुलींना लक्ष्य केले जाते ते छळ आणि बलात्काराच्या बळी ठरत आहेत. हिंदू व्यवसाय देखील जमावाकडून लक्ष्य केले जात आहेत. हिंदूंची दुकाने सातत्याने लुटली जात आहेत. या सगळ्यात लाखो रुपये लुटले जात आहेत. हिंदूंच्या जीवाच्या आणि घराच्या सुरक्षेसाठी समाजकंटक लाखो रुपयांची मागणी करत आहे. हिंदूंनी देश सोडला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली जात आहे.
मला भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करायची आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत पाठवावी. आम्हाला आमच्या देशात शांततेने जगायचे आहे. मला माहित आहे की भारत सरकार आपल्याबद्दल काळजीत आहे आणि कदाचित मदत करण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु यामध्ये विलंब केल्यास मोठी हानी होऊ शकते. बांगलादेशातील सर्व हिंदूंच्या वतीने मी तुम्हाला कारवाई करण्याची विनंती करत आहे. तुम्ही आतापर्यंत उचललेल्या पावलांसाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते.
A heart breaking letter of a 12th std hindu girl from Bangladesh.
She has requested me if this letter can reach prime minister of India @narendramodi ji
She writes – “Our pain is unimaginable, the jamaat ppl are raping the girls and women and torturing and killing the men”… pic.twitter.com/IfeKtruYhP
— Major Pawan Kumar, Shaurya Chakra (Retd) 🇮🇳 (@major_pawan) August 7, 2024
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंवर हल्ला करण्याबरोबरच जमाव त्यांची घरे आणि दुकानेही लुटत आहे. मंदिरे आणि धार्मिक स्थळेही लक्ष्य केली जात आहेत. बंगाली गायक राहुल आनंद यांच्या ढाका येथील घरावर जमावाने हल्ला केला, आग लावली आणि त्यांचे सामान लुटले. सोमवारपासून सुरू झालेल्या हिंसाचाराच्या नव्या लाटेत किमान 100 ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये तोडफोड करण्यात आलेल्या 10 हिंदू मंदिरांचा समावेश आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका व्यतिरिक्त दिनाजपूर, बोगुरा, सिराजगंज, पश्चिम जशोर, खुलना, नरसिंगडी, चितगावसह अनेक शहरांमध्ये जमावाने दहशत निर्माण केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे समर्थक आणि स्पष्ट मतदार मानले जाते. अशा परिस्थितीत शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदूंच्या संपत्ती आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.