अफगाणिस्तानमध्ये शेकडो महिला बंदुका घेऊन रस्त्यावर, कारण काय?

अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मात्र, त्याविरोधात आता अफगाणिस्तानमधील महिलांनीच दंड थोपटले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये शेकडो महिला बंदुका घेऊन रस्त्यावर, कारण काय?
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 5:26 AM

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मात्र, त्याविरोधात आता अफगाणिस्तानमधील महिलांनीच दंड थोपटले आहेत. उत्तर आणि मध्य अफगाणिस्तानमध्ये शेकडो महिला हातात बंदुका घेत रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी तालिबानविरोधी घोषणा दिल्या. याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत (Women take weapons riffles in hand and protest against Taliban in Afghanistan).

महिलांच्या या सशस्त्र आंदोलनांपैकी सर्वात मोठं आंदोलन अफगाणिस्तानमधील मध्य घोर प्रांतात झालंय. या ठिकाणी शेकडो महिलांनी हातात बंदुका घेत देशातील वाढत्या तालिबानच्या प्रभावाला विरोध करत घोषणाबाजी दिल्या आणि निषेध नोंदवला. हातात बंदुक घेतलेल्या या महिला युद्ध भूमिवर उतरणार नाहीत. हे केवळ प्रतिकात्मक आंदोलन आहे. कारण अफगाणिस्तानमधील परंपरावाद्यांचा दृष्टीकोन आणि अनुभवाची कमतरता यामुळे महिला थेट युद्धात उतरणार नाहीत. मात्र, तालिबान शासन अफगाणिस्तानमध्ये महिलांचं जगणं किती कठिण करतं याचा यावरुन अंदाज येतो. म्हणूनच महिला तालिबान राजवटीच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत.

महिला युद्ध भूमीवरही लढण्यास तयार, सरकारलाही सांगितलं

बंदुका घेऊन रस्त्यावर उतरलेल्या महिलांपैकी काही आंदोलकांचं म्हणणं आहे की त्यांच्यापैकी काही महिला केवळ सुरक्षा दलाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिकात्मक पद्धतीने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दुसरीकडे आंदोलनात अशाही महिला आहेत ज्या खरंच युद्ध भूमीवर उतरून लढण्यासही तयार आहेत. याबाबत या महिलांना सरकारलाही आपण तालिबान्यांशी लढण्यास तयार असल्याचं सांगितलंय.

तालिबानचं ग्रामीण अफगाणिस्तानवर नियंत्रण, महिलांच्या शिक्षणावर बंदी

तालिबानने ग्रामीण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केलीय. असे अनेक जिल्हे जे आधी तालिबानविरोधी होते त्यांच्यावर आज तालिबानी गटांचं नियंत्रण आहे. या भागात तालिबान्यांनी पुन्हा एकदा महिलांवर अनेक निर्बंध लादण्यास सुरुवात केलीय. यात महिलांच्या शिक्षणावर बंदी घालणे, त्यांच्या फिरण्यावर निर्बंध लादणे, कोणते कपडे घालावेत याचेही त्यांनी नियम केलेत. तसेच महिलांना बुरखा सक्ती देखील केली जातेय. एकूणच अफगाणिस्तानमधील तालिबानी महिलांना पुन्हा एकदा अधोगतीकडे घेऊन जाऊ पाहत आहेत.

हेही वाचा :

अफगाणिस्तानच्या राजधानीत 2 मोठे स्फोट, खांब तुटल्यानं उज्बेकिस्तानमधून येणारी वीज ठप्प

धक्कादायक, अफगाणिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पथकावर जीवघेणा हल्ला, 5 जणांचा मृत्यू

ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?

व्हिडीओ पाहा :

Women take weapons riffles in hand and protest against Taliban in Afghanistan

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.