Israel vs Houthi : रोखणही कठीण असं हायपरसोनिक मिसाईल इस्रायलच्या दिशेने येतं होतं पण….

Israel vs Houthi : इस्रायल एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढतोय. गाझा पट्टी, लेबनानमध्ये कारवाई सुरु असताना येमेनमधूनही इस्रायलवर हल्ला सुरु असतो. अशाच एका हल्ल्यात मिसाइलमध्ये सर्वात घातक मानलं जाणारं हायपरसोनिक मिसाईल इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलं होतं.

Israel vs Houthi : रोखणही कठीण असं हायपरसोनिक मिसाईल इस्रायलच्या दिशेने येतं होतं पण....
Missile Attack (file photo)
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 1:15 PM

बॅलेस्टिक, क्रूज मिसाईलपेक्षा पण हायपरसोनिक मिसाईल शक्तीशाली आहे. हायपरसोनिक मिसाईलचा हल्ला रोखणं सोप नाही. येमेनमधून इस्रायलवर हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाइल Palestine-2 ने हल्ला करण्यात आला. या मिसाईलसोबतच जुल्फिकार (Dhu Al-Fiqar) मिसाईलने सुद्धा हल्ला करण्यात आला. यामुळे मध्य इस्रायलमध्ये घबराट निर्माण होऊन एकच पळापळ सुरु झाली. लोक लपत होते. त्याचवेळी इस्रायलच्या एरो या एअर डिफेन्स सिस्टिमने या हायपरसोनिक मिसाईलला रोखलं. हे मिसाइल नष्ट केल्यानंतर त्याचे जळते तुकडे इस्रायलमध्ये पडले. त्यामुळे खूप वेळ सायरन वाजत होता.

लोकांना वाटलं की मिसाईलन टार्गेटला हिट केलं. जाफा आणि इलातमध्ये लष्करी टार्गेटला लक्ष्य केलं, असं हुती बंडखोरांकडून सांगण्यात आलं. जुल्फिकार मिसाईल कुठे कोसळलं? त्याची डिटेल येमेनने दिलेली नाही. हुती बंडखोरांनी मागच्या एक वर्षात इस्रायलवर 220 पेक्षा जास्त बॅलेस्टिक, क्रूज मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे हल्ला केलाय. दक्षिण इस्रायली शहर इलातमध्ये बहुतांश हल्ले झाले. इस्रायलने सांगितलं की, “हुती बंडखोरांनी तीन मिसाईल्स डागली. दोन हवेतच नष्ट झाली. तिसरं मोकळ्या जागेत पडलं”

या मिसाईलचा स्पीड काय?

काही दिवसांपूर्वी येमेनने Palestine-2 हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाइलद्वारे तेल अवीववर हल्ला केला होता. हे मिसाइल अवघ्या 11 मिनिटात 2040 km अंतर कापून टार्गेटपर्यंत पोहोचलेलं. या मिसाईलचा स्पीड 19756 km/hr आहे. या मिसाईलला रोखण खूप कठीण होतं. इस्रायलच्या एरो एअर डिफेन्स सिस्टिमने यावेळी वातावरणाच्या कक्षेतच हे मिसाईल संपवलं. या मिसाईलची रेंज 2150 किलोमीटर आहे. Palestine-2 मिसाईल हवे मध्येच दिशा बदलू शकतं. म्हणजे एअर डिफेन्स सिस्टिमच्या इंटरसेप्टर सिस्टिमला चकवा देऊ शकतं. म्हणून हायपरसोनिक मिसाइलचा हल्ला खूप खतरनाक असतो.

निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार.
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा
प्रतापगड 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा.
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा
दादा म्हणजे बारामती, देव अन् काळजाचा तुकडा, बारामतीत उमेदवारीसाठी राडा.
अजित पवार मुखात? शरद पवार मनात? समर्थक संभ्रमात? दादा नेते अन् साहेब..
अजित पवार मुखात? शरद पवार मनात? समर्थक संभ्रमात? दादा नेते अन् साहेब...
विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कस जिंकल हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?
विधानसभेत भाजपची हॅट्रिक, कस जिंकल हरियाणा? कोणता फॉर्म्युला ठरला हिट?.