‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यामातून स्मार्ट मास्कची निर्मिती, मानवी गरजेनुसार करणार काम

दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी एक खास प्रकारचा मास्क तयार केला आहे. त्याला 'डायनॅमिक रेस्पिरेटर' असं नाव देण्यात आलं आहे. हा एक स्मार्ट मास्क आहे जो व्यक्तीच्या गरजेनुसार आपले कार्य बदलतो.

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यामातून स्मार्ट मास्कची निर्मिती,  मानवी गरजेनुसार करणार काम
मास्क
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 12:37 PM

मुंबई : सध्या अनेक नवनव्या आधुनिक संकल्पना समोर येत आहे. अनेक ठिकाणी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) चा वापर करुन मानवी जीवन अधिक सुसह्य बनविण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट वर्क करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केला जात आहे. आता याच तंत्रज्ञानाचा वापर करुन दक्षिण कोरियात (South Korea) स्मार्ट मास्क (Smart Mask) तयार करण्यात आले आहे. मानवीय गरजांनुसार हे मास्क काम करणार आहेत. मानवी गरजा लक्षात घेऊन दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी हे मास्क तयार केले असून त्याला ‘डायनॅमिक रेस्पिरेटर’ (Dynamic Respirator) असे नाव दिले आहे. हा एक स्मार्ट मास्क आहे जो व्यक्तीच्या गरजेनुसार बदलतो. सोल नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरियाचे शास्त्रज्ञांनी हे मास्क तयार केले आहे. स्मार्ट मास्कच्या मदतीने चालताना किंवा व्यायाम करताना श्वास घेण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नसल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.

स्मार्ट मास्कची वैशिष्ट्ये

सोल नॅशनल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘एखादी व्यक्ती व्यायाम करताना किंवा चालताना मास्क लावते, परंतु या काळात शरीराला सर्वात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते. परिणामी, व्यक्ती वेगाने श्वास घेण्यास सुरुवात करते, मास्कमुळे श्‍वसनाची समस्या निर्माण होत असते. या गरजा लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने सुसज्ज मास्क तयार केले आहेत.’

‘असे’ काम करते स्मार्ट मास्क

सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सेउंग ह्वान यांच्या मते, ‘जेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज असते तेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने सुसज्ज असलेला हा मास्क, मास्कच्या फिल्टर होलचा आकार वाढवतो. विशेष म्हणजे या सर्व गोष्टी आपोआप होत असतात. साहजिकच आपण एखादी काम करीत असताना आपल्याला ऑक्सिजनची गरज अधिक भासते. आपोआप मास्कचे होल मोठे झाल्याने आपणास मुबलक प्रमाणात वायू मिळत असतो.’ न्यूज मेडिकलच्या रिपोर्टनुसार, या मास्कमध्ये असा सेन्सर बसवण्यात आला आहे जो पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) कणांची चाचणी करतो. त्यातून हवा किती प्रदूषित आहे, हेही कळते. या सेन्सरच्या मदतीने प्रदूषणाची माहितीही मिळते.

मास्कचा त्रास होणार कमी

या मास्कमुळे मानवाच्या स्थितीनुसार आणि बाहेरील वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल होत असतो. पहिल्यांदाच असा मास्क तयार करण्यात आला आहे जो मानवी गरजा ओळखून मास्कच्या फिल्टरवर लक्ष केंद्रित करतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, ‘आता अशा मटेरियलवर काम करण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून मास्क लावताना श्वास घेण्यास त्रास होणार नाही. मास्कमुळे अनेकांना श्‍वास घेण्यास त्रास होत असतो. त्यामुळे त्याचा वापर करणे टाळले जाते. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे मास्कचा पहिल्यासारखा त्रास होणार नाही व लोक त्याचा वापर करतील,’ असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबधित बातम्या

Ola-Uber आणि Rapido मध्ये तुम्ही स्वतःचे नाव, पत्ता देता..त्या सर्व माहितीचे कंपन्या काय करतात माहितीये?

देशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी 543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ ?

या वर्षी अन्नासाठी युध्द ? काय आहे नास्त्रेदमस यांच भाकीत जाणून घ्या…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.