Biofuel : काय असतो बायोफ्यूल, आपल्याला ग्लोबल वार्मिंगपासून कसा वाचवतो?
बायोफ्यूलचं प्रमाण वाढल्यास कच्च्या तेलाची आयात कमी होईल. याशिवाय पर्यावरण प्रदूषण कमी होईल. बायोफ्यूल हे ४७ टक्के प्रदूषण कमी करते.
नवी दिल्ली : बायोफ्यूल म्हणजे जैवइंधन. बायोफ्यूल आपल्याला ग्लोबल वार्मिंगपासून वाचवतो. पारंपरिक इंधनाची मागणी वाढत आहे. पण, त्यातून प्रदूषण निर्माण होते. बायोफ्यूल वाढवण्यास सांगितलं जातं. बायोफ्यूल हे एक ऊर्जेचं स्त्रोत आहे. बायोफ्यूल हा कधीही संपणारा नाही. रुडोल्फ डीजल यांनी वनस्पती तेलाचा यशस्वी प्रयोग केला. त्यांनी मुंगफल्लीच्या तेलापासून एका इंजीनला चालवण्यात यश मिळवलं. बायोफ्यूल हे एक पारंपरिक इंधन आहे. कार्बन उत्सर्जन थांबवू शकतो. बायोफ्यूलचं प्रमाण वाढल्यास कच्च्या तेलाची आयात कमी होईल. याशिवाय पर्यावरण प्रदूषण कमी होईल. बायोफ्यूल हे ४७ टक्के प्रदूषण कमी करते.
काय आहे याचं महत्त्व
पारंपरिक इंधनाचे प्रमाण कमी होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. येणाऱ्या काळात इंधनाच्या किमती वाढणार आहेत. इलेक्ट्रिक वाहन याला पर्याय ठरत आहेत. परंतु, इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती तुलनेत जास्त आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्त त्या खरेदी करू शकत नाही. अशावेळी बायोफ्यूल चांगला पर्याय ठरू शकते. बायोफ्यूल हे पारंपरिक इंधनाच्या तुलनेत कमी किमतीत मिळते.
भारतात इंधनाचे काही पर्याय
भारतात बायोफ्यूलचे काही पर्याय उपलब्ध आहेत. यासंदर्भात जाणीवजागृती करावी लागते. याचा पहिला पर्याय हा बायोइथेनॉल आहे. बायोइथेनॉल हे ऊस, ज्वारी यापासून तयार होते. स्टार्च असणाऱ्या पदार्थामधूनही बायोइथेनॉल तयार होते.
बटाटे, मक्का तसेच लाकडाचा कचरा, कृषी अवशेष याचा प्रमुख पर्याय आहे. बायोइथेनॉलवर चालणारी कार बाजारात आणणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं होतं. याशिवाय बायोडीझल, जैवइंधन, बायोसीएनजी हे पारंपरिक इंधनाचे पर्याय ठरू शकतात.
पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याला पर्याय शोधणे गरजेचे आहे. त्यामुळे बायोफ्यूल हा एक चांगला पर्याय आहे. याचे फायदेही बरेच आहेत. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीकोणातून बायोफ्यूल चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापरही करता येईल. यामुळे पर्यावरण रक्षण होईल.