काय खरंच सिंह हा “जंगलाचा राजा” आहे, या गोष्टीत किती आहेत तथ्य?
सिंहाला हा जंगलाचा राजा (King of jungle) म्हटले जाते पण खरंच असे आहे का? तज्ञ मंडळींचे म्हणणे आहे की "नाही". सिंह जंगलाचा राजा आहे ,तज्ञ मंडळी ही गोष्ट का नाही मानत? जाणून घेऊया या प्रश्नांचे उत्तर
जगामध्ये सर्वात जास्त सिंह आफ्रिकेमध्ये आढळतात. सिंहाला जंगलाचा राजा (King of jungle) म्हटले जाते पण खरेच असे आहे का? तज्ञ मंडळी यांच्या मते सिंहा ला भले ही आपण जंगलाचा राजा मानत असू परंतु तसे पाहायला गेले तर सिंह (Lion) जंगलामध्ये कधीच राहत नाही. याचे अनेक कारणे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत.बीबीसी अर्थ यांच्या रिपोर्टनुसार सिंहांच्या विश्वामध्ये अशा प्रकारची सिस्टीमच नसते ज्यामध्ये एखाद्या लहान किंवा एखाद्याला मोठे असे मानले जाईल. यांच्या दुनियामध्ये प्रत्येक सदस्याला बरोबरीचा हक्क दिला जातो. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास यांच्या प्रजातीमध्ये रँकिंग (Ranking System) सिस्टमच नसते. सिंह जंगलाचा राजा आहे, तज्ञ मंडळी या गोष्टीला नेमके काय नकार देत आहे त्यामागे नेमके काय कारणे आहेत असे असेल तर नेमके जंगलाचा राजा कोण आहे चला तर मग जाणून घेऊ या बद्दल…
काय खरंच सिंहाना जंगलात राहणे पसंत असते?
एका रिपोर्टनुसार जगात सर्वात जास्त सिंह आफ्रिकेमध्ये आढळतात ,यामध्ये अंगोला, बोत्सवाना, तंजानिया या देशांचा सुद्धा समावेश आहे .काही सिंह सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक, साउथ सूडान आणि भारतामध्ये सुद्धा आढळतात. एका रिपोर्टनुसार सिंहा ला जंगलाचा राजा म्हटले जाते परंतु सर्वात आश्चर्य करणारी बाब म्हणजे सिंहांना जंगलामध्ये राहणे अजिबात आवडत नाही. सिंहांना डोंगर-दऱ्या ,गवताळ भागात आणि झाडी झुडपेमध्ये राहायला आवडत असते.
मग सिंहीण झाली जंगलाची राणी…
रिपोर्टनुसार सिंहावर संशोधन करणारे सांगतात की , जर योग्य दृष्टिकोनातून पाहावयास गेले तर सिंहीणला जंगलाची राणी मानले पाहिजे. तिच्याजवळ जास्त जबाबदारी असतात आणि या सगळ्या जबाबदारी तितक्याच आनंदाने आणि शक्तिशाली पद्धतीने निभावत असते. दुसऱ्या बिग कॅटच्या तुलनेमध्ये सिंह समूहात राहणे पसंत करतात. हे खूपच विशेष असतात. यांच्या समूहामध्ये 3 पासून ते 40 जनावर एकत्रित सोबत राहतात त्याचबरोबर 13 वयस्क सिंह एकसोबत राहतात. यांच्यात मादी सिंहीनीची संख्या जास्त असते.
रिपोर्टनुसार नरसिंहाचे मुख्य काम आपल्या झुंडीचे संरक्षण करणे असते तसेच मादी सिंहीण कडे अनेक जबाबदाऱ्या असतात. जसे की जंगलामध्ये असणाऱ्या जनावरांचे भोजन – जेवणाची संपूर्ण जबाबदारी मादीकडे असते व मुलांचे पालन-पोषण पासून ते त्यांना शिकार यापासून संरक्षण करण्याचे कार्य संपूर्ण मादी सिंहीणकडे असते.
संशोधनामध्ये एक गोष्ट सिद्ध झाली आहे की शिकार करणे हे सिंहीण चे प्रमुख काम असते तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नर असू द्या की मदी या दोघांमध्ये शिकार करण्याची क्षमता एकसारखीच असते. म्हणजेच दोघेही एक सारखे असून कोणीही कोणापेक्षा कमी जास्त नसतो. तसेच संशोधनानुसार एका गोष्टीला मान्यता मिळालेली आहे की या दोघांमध्ये कोण लहान आणि मोठा नसतो म्हणजेच कुणाला क्रमांक,दर्जा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले गेले तर सिंहाचा राजा होण्याबद्दल ची अशी कोणतीच गोष्ट संपूर्णपणे सिद्ध होत नाही.