Asteroid : 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतराळातील बदलामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण, पृथ्वीवर या घटनेचा असा होईल परिणाम!

लवकरच पृथ्वीच्या जवळून एक मोठा एस्टेराइड जाणार आहे,अशा प्रकारच्या बातम्यां हल्ली जोर धरत आहे आणि असे म्हटले जात आहे की, 11 फेब्रुवारी रोजी हा एस्टेरॉइड पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. अशातच भारतासाठी ही घटना कशाप्रकारे धोकादायक ठरू शकते चला तर मग जाणून घेऊया या बद्दल.

Asteroid : 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतराळातील बदलामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण, पृथ्वीवर या घटनेचा असा होईल परिणाम!
पृथ्वीच्या जवळून एक मोठा एस्टेराइड जाणार आहे
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 11:09 PM

मुंबई : अंतराळामध्ये (Celestial Event) दररोज अनेक आकाशातील घटना घडत असतात. अनेकदा कोणता ना कोणता ग्रह एखाद्या ग्रहाच्या आजूबाजूने जात असतो किंवा एकमेकांसोबत धडकण्याचा अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला तसेच ऐकायला मिळतात. तसेच अंतराळामध्ये घडणाऱ्या घटनांचा परिणाम पृथ्वीवर सुद्धा होत असतो ,ज्यामध्ये सूर्यग्रहण (Solar Eclipse) व चंद्रग्रहण यांसारख्या इत्यादी घटनाचा समावेश असतो. परंतु नुकताच नासाचा (NASA) एक रिपोर्ट आलेला आहे आणि या रिपोर्टनुसार पृथ्वीसाठी चिंतेचं वातावरण निर्माण करणारी घटना भविष्यात घडणार आहे.असे म्हटले जात आहे की ,एका मोठ्या विशाल आकाराचा एस्टेरॉइड म्हणजेच ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे आणि याचा विपरीत परिणाम पृथ्वीवर सुद्धा घडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या सगळ्या चर्चेमध्ये आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे की, हा ग्रह म्हणजेच एस्टेरॉइड किती मोठा आहे त्याचबरोबर हा एस्टेरॉइड पृथ्वीला धडकणार आहे का ? आणि असे जर घडणार असेल तर तो पृथ्वीला कशा पद्धतीने धडकू शकतो ज्यामुळे अशा प्रकारचे नुकसान होऊ शकेल. असे विविध प्रकारचे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होताना पाहायला मिळत आहे. जर तुमच्या मनात सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतील तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा एस्टेरॉइड कशा प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण करू शकतो त्याच बरोबर आज आपण नासाचा रिपोर्ट नेमका काय सांगत आहे याबद्दल सुद्धा सविस्तर जाणून घेणार आहोत.

अंतराळातील अपडेट काय आहे ?

खरेतर नासाचा एक रिपोर्ट समोर आला आहे आणि या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, लवकरच अंतराळातून एखादा धोका उद्भवणार आहे. तसे पाहायला गेले तर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पृथ्वीच्या आजूबाजूला अनेक ग्रह आपल्याला पाहायला मिळत आहेत व त्याच्या बातम्या सुद्धा अनेकदा कानी पडत आहेत परंतु आता सांगण्यात येत आहे की, एक खूपच मोठा ग्रह म्हणजेच एस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळून जाणार आहे अशातच ही घटना पृथ्वीसाठी धोका असल्याचे मानले जात आहे. या बद्दल खगोलशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केलेली आहे तसेच त्यांना हा एस्टेरॉइड पृथ्वीला धडकणार तर नाही ना अशी शंका मनामध्ये येऊन याचे टेन्शन सुद्धा आलेले आहे.

किती मोठा आहे हा एस्टेरॉइड?

रिपोर्टनुसार या एस्टेरॉइडला नासाकडून धोकादायक मानले जात आहे. असे म्हटले जात आहे की ,हा एस्टेरॉइड अंदाजे 100 माळ्याची जितकी इमारत मोठी असते. तितका मोठा हा एस्टेरॉइड आहे, म्हणजेच हा एस्टेरॉइड अंदाजे 4 हजार 265 फूट रुंद आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की जर इतका विशाल महाकाय एस्टेरॉइड जर भविष्यात पृथ्वीला धडकला तर पृथ्वीमध्ये विनाश होण्याची शक्यता असू शकते व याचा अंदाज न लावलेलाच बरा.. असे म्हटले जात आहे की हा एस्टेरॉइड 11 फेब्रुवारी रोजी पृथ्वीच्या जवळ येईल.

पृथ्वीपासून किती अंतरावरून जाईल हा एस्टेरॉइड

शास्त्रज्ञांच्या मते हा एस्टेरॉइड पृथ्वीपासून 3 मिलियन किलोमीटर अंतरावरून प्रवास करेल. हा एस्टेरॉइड खूपच जलद गतीने पुढे प्रवास करत आहे आणि असा अंदाज लावला जात आहे की 11 फेब्रुवारी रोजी हा एस्टेरॉइड पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल त्याचबरोबर नासाच्या रिपोर्टमध्ये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की हा एस्टेरॉइड पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत नाहीये म्हणूनच पृथ्वीसाठी जास्त काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आपणास सांगू इच्छितो की, खगोल शास्त्रज्ञ व वैज्ञानिक अशा प्रकारच्या ग्रहावर सातत्याने लक्ष ठेवून असतात जेणेकरून याबद्दल योग्य तो अंदाज लावता येईल तसेच जर भविष्यात हा एस्टेरॉइडने पृथ्वीच्या दिशेने प्रवास केला आणि पृथ्वीवर धडकणार असेल तर पृथ्वीचा खूप मोठा विनाश होऊ शकतो.

या एस्टेरॉइड चा शोध 21 फरवरी 1900 मध्ये लावण्यात आला होता. हा एस्टेरॉइड प्रत्येक वर्षी सोलर सिस्टमच्या जवळून प्रवास करतो आणि आजच्या दिवसाला गेल्या वर्षापूर्वी सुद्धा 18 फरवरी 2021 ला सुद्धा हा एस्टेरॉइड पृथ्वीच्या जवळ होता आतापर्यंत खगोलशास्त्रज्ञांनी अंदाज लावला आहे की त्यांच्या मते पृथ्वीला हा एस्टेरॉइड धडकण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा एस्टेरॉइड ज्या भागातून प्रवेश प्रवास करत आहे ते क्षेत्र पृथ्वीपासून खूपच दूर आहे.

इतर बातम्या :

साबुदाणा नेहमी प्रश्नांच्या तावडीत का सापडतो? जाणून घेऊया साबुदाणा बनवण्याबाबतच्या प्रक्रिये बद्दलची सत्यता

अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली\

कंगनाची लवकरच ओटीटीवर एंट्री; डेटिंग रिअ‍ॅलिटी शो करणार होस्ट?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.