Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI रिवॉर्ड पॉईंट स्कॅमपासून सावधान! अन्यथा रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

सध्या फसवणुकीचे प्रकार खूप वाढत चालले आहेत. मोबाईलमुळे फसवणुकीच्या प्रकार वाढले आहेत. कारण मोबाईलमधील डेटा हँक करुन कोणीही तुमची माहिती चोरु शकतो. आता एसबीआयच्या ग्राहकांना खोटे मेसेज पाठवून त्यांना फसवले जात आहे. कशाप्रकारे होतेय ही फसवणूक जाणून घ्या.

SBI रिवॉर्ड पॉईंट स्कॅमपासून सावधान! अन्यथा रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 7:38 PM

तुमचे जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. SBI मध्ये करोडो लोकांची खाती आहेत. याचाच फायदा घेण्यासाठी लोकं फसवुकीचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतात. पण जर तुम्ही आधीच सावध असाल तर तुम्ही या फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचू शकता. कारण तामिळनाडूमध्ये अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. ज्यामध्ये लोकांची फसवणूक झाली आहे. या तक्रारींनंतर पोलिसांनी ‘एसबीआय रिवॉर्ड पॉइंट्स स्कॅम’ संदर्भात एक ॲडव्हायजरीही जारी केली आहे.

पोलिसांनी म्हटले आहे की,यामध्ये तुमचे रिवॉर्ड पॉइंट्स संपले असल्याचा दावा करतात आणि यासंदर्भात बनावट संदेश पाठवतात. मेसेजमध्ये एक लिंक दिलेली असते. तुम्ही जर या लिंकवर क्लिक केले की, एक एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ज्यामाध्यमातून स्कॅमर तुमच्या स्मार्टफोनपर्यंत पोहोचतात आणि तुमची वैयक्तिक माहिती आणि आर्थिक माहिती देखील चोरतात.

काय आहे हा SBI रिवॉर्ड पॉइंट्स घोटाळा?

SBI आपल्या ग्राहकांना SBI Reward Points देते. ज्याद्वारे ग्राहक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे कोणताही व्यवहार करतात, तेव्हा SBI ग्राहकांना काही पॉइंट देते. या पॉइंट्सद्वारे ग्राहक रिचार्ज करू शकतात, प्रवास करू शकतात किंवा खरेदी करू शकतात. या रिवॉर्ड पॉइंट्सची एक्सपायरी डेट देखील असते. जर ते 24 महिने म्हणजे 2 वर्ष वापरले गेले नाहीत तर ते कालबाह्य होतात.

याचा फायदा घेत स्कॅमर प्रथम लोकांचे स्मार्टफोन हॅक करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते SBI रिवॉर्ड पॉइंट्सबाबत स्मार्टफोनवर बनावट मेसेज पाठवतात. हा मेसेज ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आयकॉन आणि नावासह येतो, ज्यामुळे तो सत्य असल्या सारखा दिसतो. SBI रिवॉर्ड पॉइंट्स’ बद्दल बनावट संदेश पाठवण्यासाठी आता ते WhatsApp चा ही वापर करत आहेत. हॅकर्स ग्रुप आयकॉन आणि नाव बदलून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ देखील करू शकतात.

जेव्हा तुम्ही व्यक्ती लिंकवर क्लिक करतात. तेव्हा एक एपीके फाइल (Android पॅकेज) डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ही एपीके फाइल तुम्ही डाउनलोड केली की लगेच त्या डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल करते. या मालवेअरद्वारे बँकिंग क्रेडेन्शियल्स म्हणजेच ग्राहकाचे नाव, पासवर्ड, स्मार्टकार्ड, टोकन किंवा बायोमेट्रिक किंवा इतर वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.

SBI ने देखील आपल्य ग्राहकांना यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ‘ग्राहकांनी त्यांच्या फोनवर येणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सशी संबंधित मेसेजबाबत काळजी घ्यावी. असे मेसेज ग्राहकांना पाठवले जात आहेत.

संशयास्पद गोष्टीची त्वरित तक्रार करा

लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसली की लगेच डेटा बंद करा. ज्यामुळे बॅकअपमध्ये कोणतीही क्रियाकलाप होत असल्यास, ती थांबेल. यानंतर सायबर क्राइम टोल फ्री हेल्पलाइन नंबर 1930 किंवा www.cybercrime.gov.in वर तुमची तक्रार ताबडतोब नोंदवा.

SBI रिवॉर्ड पॉइंट्स कसे रिडीम करायचे?

1 रिवॉर्ड पॉइंट 25 पैशांच्या बरोबरीचा आहे. म्हणजेच, 1000 रिवॉर्ड पॉइंट्ससह, ग्राहक 250 रुपयांपर्यंत खरेदी करू शकतो.

सर्व प्रथम https://rewardz.sbi/ वर जा. यानंतर New User च्या पर्यायावर क्लिक करा. SBI Rewardz Customer ID एंटर करा. यानंतर मोबाइल नंबरवर OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर, तुमचे वैयक्तिक तपशील भरा

तपशीलांची पडताळणी केल्यानंतर रिवॉर्ड पॉइंट रिडीम केले जाऊ शकतात. कोणतेही ॲप डाउनलोड करण्यासाठी, Google Play Store किंवा Apple App Store सारखे प्लॅटफॉर्म वापरा. डाऊनलोड करण्याआधी त्याचे रेटिंग तपासा.

'माझं बरं वाईट झाल्यास आई अन्...', संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाब
'माझं बरं वाईट झाल्यास आई अन्...', संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाब.
'आम्हाला एक खून माफ करा', रोहिणी खडसेंच राष्ट्रपतींना पत्र, उडाली खळबळ
'आम्हाला एक खून माफ करा', रोहिणी खडसेंच राष्ट्रपतींना पत्र, उडाली खळबळ.
'जलयुक्त शिवार-२' ला मान्यता, मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा
'जलयुक्त शिवार-२' ला मान्यता, मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा.
महाराजांवरून गरळ ओकणाऱ्यांवर राजे भडकले,म्हणाले, '..त्याची नसबंदी करा'
महाराजांवरून गरळ ओकणाऱ्यांवर राजे भडकले,म्हणाले, '..त्याची नसबंदी करा'.
मुंडेंचा राजीनामा तरी विरोधकांकडून घेराव, विधानसभेत माहितीच दिलीच नाही
मुंडेंचा राजीनामा तरी विरोधकांकडून घेराव, विधानसभेत माहितीच दिलीच नाही.
'खोक्या' मालामाल? कारनामे बघाच, सतीश भोसलेच्या नव्या व्हिडीओनं खळबळ
'खोक्या' मालामाल? कारनामे बघाच, सतीश भोसलेच्या नव्या व्हिडीओनं खळबळ.
आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल.
'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला
'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला.
दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video
दमानियांनी शेअर केला सतीश भोसलेचा पैसे उधळतांनाचा आणखी एक Video.
“पैसे दे नाहीतर मारून टाकीन”, कराडला कोणी दिली धमकी अन खंडणी केली वसूल
“पैसे दे नाहीतर मारून टाकीन”, कराडला कोणी दिली धमकी अन खंडणी केली वसूल.