इंग्लंडमध्ये व्हर्जिनिटी चाचणीवरून वाद का?, खासदारांकडून चाचणीवर बंदीची मागणी का?, जाणून घ्या सविस्तर!

इंग्लंडमध्ये व्हर्जिनिटी चाचणी आणि हायमेन 'रिपेअर' शस्त्रक्रियेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. आता खासदार यावर बंदी घालण्यासाठी एकत्र येत आहेत आणि हा कायदा बेकायदेशीर करण्याची मागणी करत आहेत. तेव्हापासूनच व्हर्जिनिटी चाचणीचा मुद्दा गाजत आहे.

इंग्लंडमध्ये व्हर्जिनिटी चाचणीवरून वाद का?, खासदारांकडून चाचणीवर बंदीची मागणी का?, जाणून घ्या सविस्तर!
व्हर्जिनिटी चाचणीवरून वाद
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 3:47 PM

मुंबई : इंग्लंडमध्ये व्हर्जिनिटी चाचणी आणि हायमेन ‘रिपेअर’ शस्त्रक्रियेवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. आता खासदार यावर बंदी घालण्यासाठी एकत्र येत आहेत आणि हा कायदा बेकायदेशीर करण्याची मागणी करत आहेत. तेव्हापासूनच व्हर्जिनिटी चाचणीचा मुद्दा गाजत आहे. ब्रिटिश खासदार एंटनी हिगिनबॉथम आणि सारा ब्रिटक्लिफ एक क्रॉस-पार्टी युतीमध्ये सामील झाल्या आहेत. (Big controversy over virginity test in England MPs oppose virginity hymen repair surgery)

यासह, Stephen Metcalfe ने ट्विटरच्या माध्यमातून क्रॉस पार्टीमध्ये सामील होण्याविषयी देखील सांगितले आहे. आता यामुळे हायमेन ‘रिपेअर’ शस्त्रक्रिया आणि व्हर्जिनिटी चाचणी म्हणजे नेमके काय आहे. आणि हा व्हर्जिनिटी चाचणीचा नेमका वाद काय आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हायमेन ‘रिपेअर’ शस्त्रक्रिया आणि व्हर्जिनिटी चाचणीवर बंदी घालण्याची मागणी का सातत्याने इंग्लंडमध्ये केली जात आहे. हे आपण सविस्तरपणे बघूयात.

नेमकं काय घडत आहे

खरं तर, अलीकडेच अनेक ब्रिटिश खासदारांनी क्रॉस-पार्टीला पाठिंबा दिला आहे, जे बऱ्याच काळापासून या चाचणीच्या विरोधात आवाज उठवत आहेत. ‘व्हर्जिनिटी’ आणि हायमेन ‘दुरुस्ती’ शस्त्रक्रिया किंवा हायमेनोप्लास्टी दोन्ही कायदेशीर आहेत. यामुळे महिलांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जातो आणि या चाचण्या लग्नाआधी केल्या जातात. अशा परिस्थितीत हा कायदा महिलाविरोधी मानला जात आहे आणि एक वर्ग त्याला मोठा विरोध करत आहे.

व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रिया ?

व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेत योनीच्या त्वचेचा एक थर दुरुस्त केला जातो. जेणेकरून हायमेन तुटलेला दिसत नाही. या शस्त्रक्रियेला हायमेनोप्लास्टी असे देखील म्हणतात. यूकेमध्ये बहुतेक मुली आणि स्त्रियांना त्यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी हायमेनोप्लास्टी केली आहे. जेणेकरून त्या पूर्णपणे वर्जिन दिसतील. विशेष म्हणजे या व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेला मोठी फी देखील घेतली जाते.

विरोध करण्याचे कारण काय आहे?

विवाहाच्या पहिल्या रात्री रक्तस्त्राव होणे आवश्यक आहे’ या कल्पनेतून स्त्रिया आणि मुलींवर ही शस्त्रक्रिया केली जाते. यूकेच्या विधिज्ञांचा असा विश्वास आहे की या वेदनादायक पद्धतींना वैद्यकीय शास्त्राचा कोणताही आधार नाही. अशा पद्धती केवळ स्त्रियांना हानी पोहचवतात. ‘ व्हर्जिनिटी चाचणी’ आणि हायमेन ‘दुरुस्ती’ शस्त्रक्रिया दोन्ही टाळण्यासाठी आपण त्वरित पावले उचलली पाहिजेत. असे मानले जाते की बऱ्याच वेळा महिलेची इच्छा नसताना तिला ही शस्त्रक्रिया करावी लागते.

डाॅक्टरांचा व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेला विरोध

ब्रिटिश डॉक्टरांनी व्हर्जिनिटी रिपेयर शस्त्रक्रियेविरोधात मोर्चा सुरू केला आहे. जोपर्यंत ‘व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर’ च्या नावाखाली बनावट ऑपरेशन बंद होत नाहीत, तोपर्यंत व्हर्जिनिटी चाचणीबाबत कायदा बनवून उपयोग नाही, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनेकोलॉजिस्ट (आरसीओजी) ने सरकारला इशारा दिला आहे आणि व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर शस्त्रक्रियेवर कठोर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर तेथील डाॅक्टरांनी व्हर्जिनिटी चाचणी रिपेयर करणाऱ्या रूग्णालयांवर आणि डाॅक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.

संबंधित बातम्या : 

Jaggery Benefits : वजन कमी करण्यापासून शरीराला डिटॉक्स करण्यापर्यंत फायदेशीर गूळ, जाणून घ्या याचे फायदे

Pregnancy Care :गर्भधारणेदरम्यान प्रत्येक स्त्रीच्या आहारात ‘या’ गोष्टी असणे आवश्यक!

खोकल्याचा आवाज ऐकून अ‍ॅप सांगणार आजार; अमेरिकन संशोधकांनी शोधलं नवा अ‍ॅप!

(Big controversy over virginity test in England MPs oppose virginity hymen repair surgery)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.