12 वर्षांनंतर ‘भाड्याचं घर आणि खाली कर’ म्हणता येत नाही, भाडेकरु करु शकतो मालकी हक्काचा दावा

Landlord And Tenant Laws : दीर्घकाळ एकाच घरात राहिलं तर भाडेकरुला मालमत्तेवर ताबा मिळवता येतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला भाडेकरुबद्दलचा कायदा काय आहे? भाडेकरु तुमच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतो का? आणि मालकांकडे कुठले अधिकार असतात, याबद्दलची सगळी माहिती देणार आहोत.

12 वर्षांनंतर 'भाड्याचं घर आणि खाली कर' म्हणता येत नाही, भाडेकरु करु शकतो मालकी हक्काचा दावा
12 वर्षांहून जास्तकाळ एकाच घरात राहिल्यास भाडेकरु घरावर मालकी हक्क सांगू शकतो
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 5:49 PM

मुंबई: बरीच वर्ष भाड्याच्या ( Rented House ) घरात राहिल्यानंतर, भाडेकरु ( Tenant) घर खाली करत नाही, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. याच भीतीने मालक (Landlord) सध्या 11 महिन्याच्या करारावरच ( Rent Agreement ) घर भाड्याने देतात, आणि त्यानंतर ते खाली करण्यास सांगतात. जास्त दिवस भाडेकरुला ठेवल्यास तो घर खाली करणार नाही आणि त्या घरावर त्याचा ताबा येईल अशी भीती मालकांना सतावते. याबाबत अनेक बातम्या नेहमी सोशल मीडियावर फिरताना दिसतात, ज्यात भाडेकरुने प्रॉपर्टी बळकावल्याचं सांगितलं असतं. ( Can a tenant claim ownership of the property after 12 years, Know About Landlord And Tenant Laws)

विशिष्ट परिस्थितीत कायद्यानुसार, दीर्घकाळ एकाच घरात राहिलं तर भाडेकरुला मालमत्तेवर ताबा मिळवता येतो. त्यानंतर भाडेकरु घर खाली करत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला भाडेकरुबद्दलचा कायदा काय आहे? (Landlord And Tenant Laws) भाडेकरु तुमच्या संपत्तीवर हक्क सांगू शकतो का? आणि मालकांकडे कुठले अधिकार असतात की ज्याद्वारे ते घर खाली करवून घेऊ शकतात. याबद्दलची सगळी माहिती देणार आहोत.

कायदा काय सांगतो?

अॅडव्होकेट चेतन पारीक यांच्यामते, सामान्य परिस्थितीत संपत्तीवर नेहमी मालकाचा हक्क असतो, भाडेकरु त्यावर हक्क सांगू शकत नाही. मात्र काही परिस्थितीत भाडेकरुही या संपत्तीवर हक्क सांगू शकतो. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अ्ॅक्टनुसार, एडवर्स पजेशनच्या केसमध्ये हा नियम बदलतो. या नियमानुसार 12 वर्षाहून मालमत्ता जर कब्जेदाराकडेच असेल, तर त्याच्या संमतीशिवाय ती विकता येत नाही. किंवा कब्जेदार वा भाडेकरु तिच्यावर हक्क सांगू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने 7 ऑगस्ट 2019 ला रविंद्र कौर ग्रेवाल विरुद्ध मंजीत कौर केसममध्ये हा निकाल दिला होता.

दरवर्षी भाडेकरार करणं हा उत्तम मार्ग

म्हणजेच जर कुठल्याही व्यक्तीकडे तुम्ही तुमची मालमत्ता सांभाळण्यासाठी दिली आहे. आणि याला 11 वर्षाहून अधिक काळ झाला आहे, तर तो भाडेकरु वा सांभाळणारा त्या मालमत्तेवर दावा करु शकतो. मात्र, समजा कुणी भाडेकरु आहे, ज्याचं दरवर्षी नवी भाडेकरार केला जातो आहे, मग, तो व्यक्ती त्या घरात 12 वर्षाहून अधिक जरी राहिला तरी त्याला संपत्तीवर दावा करता येत नाही. म्हणजेच, संपत्ती जाण्याचा धोका टाळण्यासाठी दरवर्षी नवीन भाडेकरार करणं हा उत्तम मार्ग आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला होता?

काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता, ज्यात म्हटलं गेली की लिमिटेशन अॅक्ट 1963 नुसार, खासगी स्थावर मालमत्तेसाठी 12 वर्षांची सीमा आहे तर सरकारी स्थावर मालमत्तेसाठी 30 वर्षांची सीमा आखून दिलेली आहे. म्हणजेच, खासगी मालमत्तेवर 12 वर्षाहून अधिक काळ कुणी व्यक्ती राहत असेल किंवा सरकारी जागेवर 30 वर्षांहून अधिक काळापासून एखाद्याचा ताबा असेल तर ताबा असणारे कोर्टात मालकी हक्क सांगू शकतात.

हेही वाचा:

केंद्र सरकार या योजनेअंतर्गत मुलींना देतेय एक लाख 60 हजार रुपये रोख, जाणून घ्या काय आहे सत्य?

घराच्या छतावर Solar Panel बसवा, मोफत वीज मिळवा! जाणून घ्या किती खर्च येईल?

 

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.