कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा ? लस प्रभावी आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?

भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. Coronavirus Delta plus variant

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसपासून बचाव कसा करायचा ? लस प्रभावी आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात?
Corona Update
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 5:07 PM

नवी दिल्ली: भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. AY.1 Variant असं नाव विषाणूला देण्यात आलं आहे. नव्या वेरियंटमुळे विषाणूतज्ज्ञदेखील चिंतेत असून त्यांच्याकडून अभ्यास करण्यात येत आहे. दुसरीकडे कोरोना लस या नव्या डेल्टा प्लस वेरियंटवर प्रभावी ठरणार का? असे सवाल देखील नागरिकांच्या मनात निर्माण जाले आहेत. डॉ. ए.के. वार्ष्णेय यांनी याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली आहेत. ( Corona virus Delta plus variant Symptoms how Effective Vaccine on New Variants of Sars cov 2)

1. कोरोनाच्या डेल्टा विषाणूनंतर डेल्टा प्लस चर्चेत आहे त्यापासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं वार्ष्णेय यांनी सांगितलं.

2. नव्या वेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

3. शरिरात किती अँटीबॉडी असतात?

होय! शरीरातील अँटीबॉडी किती असतात त्याची पातळी ओळखली जाऊ शकते. जेव्हा लसीची चाचणी होते तेव्हा लस किती प्रमाणात अँटीबॉडी बनवते पाहिले जाते. मात्र याबाबत सामान्य व्यक्तींनी जाणून घेण्याची गरज नाही. आपल्या शरीरात विषाणूंविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होत असतात.

4. लहान मुलांवर लसीची चाचणी कशी केली जाते?

मुलांना लस चाचणीसाठी आमंत्रित केले जाते. मात्र ते मूल निरोगी असावे, त्याला कोणतेही शारीरिक आजार असू नये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाच्या पालकांनी त्या बाबात सहमत असले पाहिजे. त्यांना लसीबाबात सर्व माहिती दिली जाते. ही लस मुलांना देण्यापूर्वी अनेक चाचण्यांमध्ये गेलेली असते. त्यामुळे लसीच्या सुरक्षिततेविषयी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या:

पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका

बीएचआर पतसंस्था गैव्यवहारप्रकरणी 12 जणांना अटक, गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयांचाही समावेश

Coronavirus Delta plus variant Symptoms how Effective Vaccine on New Variants of Sars cov 2

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.