pregnant women health | गर्भवती महिलांना कोरोनाचा धोका किती ? पोटातील बाळावर काय परिणाम ? जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
गर्भवती महिलांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. (corona child and pregnant women)
मुंबई : संपूर्ण जगाला कोरोना महामारीने ग्रासले आहे. यामध्ये भारत देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. सध्या रुग्णसंख्या कमी होत असली तर धोका पूर्णपणे टळलेला नाही. अजूनही देशात लाखो नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. तर रोज मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजारपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांच्या मनात अनेक शंका आहेत. त्यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. (danger of Corona to child and pregnant women health can women consume Zinc and Multivitamin tablets)
गर्भवती महिला मल्टिव्हिटॅमीनच्या गोळ्या घेऊ शकतात का ?
सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वात जास्त मानसिक त्रास हा गर्भवती महिलांना होत आहे. एक तर स्वत:ची काळजी तसेच पोटातील बाळाची काळजी अशी दुहेरी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागत आहे. याच कारणामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं Gynecologist डॉ. शारदा जैन यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिले आहेत. सध्याच्या कोरोनाकाळात गर्भवती महिलांना सर्वात आधी एक प्रश्न पडतो आहे. तो म्हणजे या कोरोनाकाळात त्यांनी मल्टिव्हिटॅमीन तसेच झिंकच्या गोळ्यांचे सेवन करावे का ? त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर डॉ. शारदा जैन यांनी दिलं असून ते हो असं आहे. जैन यांनी सांगितल्याप्रमाणे गर्भवती महिला व्हिटॅमीन -सी तसेच झिंकच्या गोळ्या घेऊ शकतात. ते अगदी सुरक्षित आहेत. मात्र, प्रत्यक्ष गोळ्या घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असे जैन यांनी सांगितले आहे.
गर्भवती महिलांवर कोरोनाचा काय परिणाम होतो ?
सध्याच्या कोरोनाकाळात गर्भवती महिलांवर कोणता परिणाम होतो ? हासुद्धा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्याचेही उत्तर जैन यांनी दिले आहे. त्यांनी “कोणतीही महिला जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नेंट राहते, तेव्हा तिचा गर्भपात होण्याची शक्यता ही 15 टक्के असते. मात्र, एखाद्या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली; तर त्या महिलेचा गर्भपात होण्याची शक्यता ही थेट दुप्पट होते. कोरोना संक्रमित महिलेचा गर्भपात होण्याची शक्यता ही 30 टक्के असते,” असे डॉ. शारदा जैन यांनी सांगितले.
दरम्यान, असे असले तरी कशालाही घाबरण्याचे कारण नाही. फक्त योग्य काळजी घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच कोरोनाची लागण होऊ न देण्यासाठी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असेही सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या :
सीरम इन्स्टिट्यूट Sputnik V लसीचंही उत्पादन करणार, DGCI ची मान्यता
(danger of Corona to child and pregnant women health can women consume Zinc and Multivitamin tablets)