निमंत्रण आणि आमंत्रण यात नेमका काय फरक आहे? बऱ्याच जणांना माहित नसेल
मराठी भाषेतील "आमंत्रण" आणि "निमंत्रण" या दोन शब्दांचा अर्थ जवळजवळ सारखा असला तरीही त्यात एक छोटासा फरक आहे. निमंत्रण आणि आमंत्रण हे दोन्ही शब्द वेगवेगळ्या परिस्थितीत वापरली जातात. नक्की काय आहे यातील फरक जाणून घेऊयात.

आपली मराठी भाषा जशी वळवू तशी ती वळते, शिवाय आपल्या मराठी भाषेत बरेच असे शब्द आहे ज्यांचे उच्चार थोडेफार सारखेच असतात पण अर्थ मात्र अगदी वेगळे. मराठी भाषा ही जितकी ऐकायला छान वाटते तितकीच ती उमजल्यावर बोलायला अजूनच छान वाटते. शिवाय असेही काही शब्द आहेत जे लोकांनां एक सारखेच वाटतात पण नीट समजून घेतल्यावर कळतं की यांचे अर्थ एकमेकांपासून वेगळे आहे. आज आपण अशाच दोन शब्दातील फरक जाणून घेणार आहोत.
आमंत्रण आणि निमंत्रण कोणत्या परिस्थितीत वापरले जातात?
आपण कोणत्याही कार्यक्रमात किंवा समारंभाला कोणत्याही पाहुण्यांना,मित्रमंडळींना बोलावतो. तेव्हा आपण दोन शब्द हे आवर्जून वापरतो ते म्हणजे निमंत्रण दिलं आहे किंवा आमंत्रण दिलं आहे. बरं दोन्ही शब्दांचे अर्थ एकच म्हणजे त्या पाहुण्यांना उपस्थित राहण्यास सागंणे. मग यात काही फरक असतो का तर हो. या दोन्ही शब्दांचा अर्थ जरी सारखा असला तरी त्यात एक छोटासा फरक नक्कीच आहे. पण हीच तर खरी आपल्या भाषेची गमंत आहे ना.चला जाणून घेऊया आमंत्रण आणि निमंत्रण हे शब्द कधी आणि कोणत्या परिस्थितीत वापरले जातात आणि त्याचा अर्थ काय?
आमंत्रण आणि निमंत्रण मध्ये एक छोटेसं अंतर आहे
आमंत्रण कधी वापरायचं?
आमंत्रण आणि निमंत्रण मध्ये एक छोटेसं अंतर आहे. आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन्ही शब्द जरी कोणाला बोलावण्याच्या प्रयोजनाने वापरले जात असले तरी त्यांच्यातील एक छोटासा फरक दोन्ही शब्दांना वेगळे वेगळे अर्थ देतो. जसं की जेव्हा एखाद्या कार्यक्रमात कोणी आलं किंवा नाही आलं तरी कार्यक्रम त्यांच्यावाचून खोळंबणार नाही, तो पार पाडणारच आहे, हे जेव्हा सूचित करायचं असतं तेव्हा त्या बोलवण्याला आमंत्रण हा शब्द वापरला जातो.
निमंत्रण कधी वापरायचं?
तर दुसरीकडे, ठराविक व्यक्तीच्या उपस्थतिथीशिवाय एखादा कार्यक्रम पार पडूच शकत नाही. जसं की एखाद्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते काहीतरी उद्घाटन किंवा बक्षिस समारंभ वैगरे आहे, किंवा त्यांचं भाषण आहे अशा परिस्थितीमध्ये त्या पाहुण्यांशिवाय तो कार्याक्रम पार पडू शकत नाही. तेव्हा त्यांच्यासाठी निमंत्रण हा शब्द वापरला जातो.
इंग्रजीमध्ये आमंत्रण आणि निमंत्रणला एकच शब्द आहे
आता तुम्हाला समजलं असेलंच की आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन्ही शब्द समोरच्या व्यक्तीला बोलावण्यासाठी असले तरी त्यात किती छोटसं अंतर आहे ते. एकंदरीत प्रसंगानुसार आमंत्रण आणि निमंत्रण या दोन्हींचा योग्य वापर करण्याची गरज असते. इथून पुढे कोणालाही बोलावताना म्हणजे निमंत्रण किंवा आमंत्रण देताना हा फरक नक्कीच तुमच्या लक्षात राहिलं. मात्र इंग्रजीमध्ये आमंत्रण आणि निमंत्रण दोन्हीला इनविटेशन असंच म्हणतात.
दरम्यान आपल्या भाषेत आपल्याला फक्त हे दोनच शब्द नाही असे कित्येक शब्द पाहायला मिळतील ज्यात हे असे भन्नाट अर्थ दडलेले असतात. जसे कि प्रख्यात आणि विख्यात किंवा एवढं आणि इतकं. असे बरेच शब्द सापडतील.