पोलिसांचा DGP की आर्मीचा जनरल कोण जास्त शक्तीशाली? कोणाचा किती पगार?
Director General of Police and Indian Army General: भारतीय लष्करातील जनरल यांना डीजीपीपेक्षा अधिक शक्ती आहे. कारण त्यांचे पद देशाचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित आहे. डीजीपी हे कोणत्याही एका राज्यातील पोलिसांचे सर्वोच्च पद आहे.

Director General of Police and Indian Army General: चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आर्मी जनरल आणि राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अनेकांनी पाहिले आहेत. त्यांच्या वर्दीतील रुबाब, त्यांचे व्यक्तीमत्व त्याची भुरळ अनेकांना पडते. हे दोघे आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च पदाधिकारी आहेत. या दोघांवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असते. एक अंतर्गत सुरक्षा पाहत असतो तर दुसरा बाहेरील सुरक्षा पाहत असतो.आर्मी जनरल आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या दोघांची तुलना केल्यावर सर्वाधिक पॉवर कोणाकडे आहे, त्याची माहिती तुम्हाला करुन देणार आहोत.
कोणावर काय जबाबदारी
भारतीय लष्करातील जनरल आणि राज्याचे पोलीस महासंचालक (Director General of Police) दोघे आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च अधिकारी आहे. दोघांना मिळालेले अधिकारी, जबाबदारी आणि प्रभाव वेगवेगळे आहेत. लष्कराचे जनरल राष्ट्रीय सुरक्षेसाठी जबाबदार असतात. ते थेट संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रपतींना आपला अहवाल देतात. युद्ध आणि सीमांच्या सुरक्षेमध्ये त्यांची शक्ती निर्णायक असते. तर डीजीपी हे राज्याची अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असतात. ते राज्य सरकारला आपला अहवाल देतात.
कोणाकडे जास्त अधिकारी
अधिकारांचा विचार केला तर भारतीय लष्करातील जनरल यांना डीजीपीपेक्षा अधिक शक्ती आहे. कारण त्यांचे पद देशाचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित आहे. डीजीपी हे कोणत्याही एका राज्यातील पोलिसांचे सर्वोच्च पद आहे. ते राज्याचे गृह सचिव आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अहवाल देतात.




कोणाचा किती पगार
लष्करातील जनरल आणि डीजीपीच्या पगाराचा विचार केल्यावर जनरल यांचा पगार जास्त आहे. भारतीय लष्कराच्या जनरलचा पगार दरमहा 2,50,000 रुपयांपर्यंत आहे. तसेच त्यांना इतर भत्ते देखील मिळत असतात. त्यांना सरकारी निवास, वाहने, सुरक्षा, वैद्यकीय, कॅन्टीनची सुविधा, उच्चस्तरीय पेन्शन मिळते. पोलिसांच्या डीजीपीचा पगार 2,25,000 रुपयांपर्यंत आहे. त्यांना सरकारी बंगला, वाहन, सुरक्षा, मेडिकल, डीए (महागाई भत्ता), पेन्शनही दिले जाते. परंतु लष्करातील जनरलपेक्षा राज्याच्या डीजीपीला मिळणारा सुविधा कमी आहेत.