तुमच्याकडे ही फक्त कंपनीचीच हेल्थ पॉलिसी आहे का ? तर आताच व्हा सावध

Health Policy : कंपन्या आपल्या कामगारांना हेल्थ पॉलिसी सेवा प्रदान करत असते. पण हे विमा कवच फक्त तुम्ही जो पर्यंत त्या कंपनीत काम करत आहात तो पर्यंतच असते. पण त्यानंतर तुमची विमा संरक्षण धोक्यात येऊ शकते. कंपनीच्या विमा पॉलिसीवर तुम्ही अवलंबून राहत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे.

तुमच्याकडे ही फक्त कंपनीचीच हेल्थ पॉलिसी आहे का ? तर आताच व्हा सावध
health insurance
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 5:26 PM

Health Insurance : कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा देते. विमा ( Health Policy ) सुविधा हा देखील यातीलच एक भाग आहे. पण ज्यांच्याकडे समूह आरोग्य विमा आहे ते स्वतंत्र वैयक्तिक आरोग्य योजना खरेदी करण्याचा विचार करत नाहीत. ते आरोग्य विम्यावर आणखी पैसे गुंतवण्यासाठी तयार नसतात. कॉर्पोरेट विमा असल्याने ते वैयक्तिक विम्याला महत्त्व देत नाहीत. पण असं करणं महागात पडू शकतं. कारण कंपनीने दिलेल्या आरोग्य विम्यावर अवलंबून राहणे योग्य नाही.

कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून राहू नका?

आरोग्य कधी बिघडेल हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्‍ही कंपनीचा विमा घेतला असला तर त्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. कारण जेव्हा तुम्ही तुम्ही कंपनी सोडता किंवा निवृत्त होता तेव्हा त्या कंपनीचा तुम्ही भाग नसता. त्यामुळे ती विमा पॉलिसी तुम्हाला लागू होत नाही. त्यामुळे तुम्हाला अशा वेळी विमा संरक्षण हवे असेल तर तुम्ही स्वतंत्र आरोग्य विमा खरेदी केला पाहिजे.

स्वतंत्र्य विमा पॉलिसी का घ्यावी?

आरोग्य विमा संरक्षण घेण्याचे अनेक फायदे आहेत. वाढत्या वयानुसार आपला खर्च देखील वाढत जातो. तसा जीवन विम्याचा प्रीमियम देखील वाढतो. वाढत्या वैद्यकीय खर्चानुसार कंपनी तुम्हाला पुरेसे कव्हर देत आहे का आणि सेवानिवृत्तीनंतरही कंपनीचे कव्हर कायम राहील का, हे तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली पाहिजे.

कर सवलतीत मिळतो लाभ

स्वतंत्रपणे आरोग्य विमा खरेदी केला तर तुम्हाला त्यातून कर सवलतीचा लाभही मिळतो. आयकर कायद्याच्या कलम 80D नुसार, तुम्ही एका वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपये आणि कुटुंबातील इतरांसाठी 25,000 रुपयांपर्यंतच्या पॉलिसीवर भरलेल्या प्रीमियमवर कर कपातीचा लाभ घेऊ शकता.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.