एक व्यक्ती त्याच्या पूर्ण आयुष्यात किती किलो अन्न खातो माहितीये? आकडा ऐकून हैराण व्हाल
तुम्हाला माहितीये का की एक व्यक्ती त्याच्या संपूर्ण आयुष्यात किती किलो अन्न खात असेल. एका संशोधनात हा आकडा समोर आला आहे. अन्न खाताना विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासाठी तुम्ही आज पासूनच एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.
अन्न आपल्या जीवनाचा एक अतिमहत्त्वाचा भाग आहे. आपण जे काही करतो ते अन्न मिळवण्यासाठीच करतो. आपण दिवसभरात काही ना काही खात असतो. आपण रोज जेवतो तेव्हा आपल्या शरीराला उर्जा मिळते. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्रीचे जेवण या व्यतिरिक्त आपण आणखी काही ना काही खात असतो. परंतु आपला संपूर्ण दिवस हा खाण्यापिण्याच्या जवळच असतो. पार्ट्यांची मजा जेवणाशिवाय अपूर्ण वाटते. स्वयंपाकसाठी लागणारा वेळ हाही महत्त्वाचा पैलू आहे.
विस्कॉन्सिन स्टेट जर्नलमधील एका लेखानुसार, आपण आपल्या आयुष्यातील सुमारे 2.5 वर्षे स्वयंपाक करण्यामध्ये आणि 3.6 वर्षे खाण्यात घालवतो. याचाच अर्थ आपण दररोज सुमारे 67 मिनिटे अन्न खात असतो. विचार करा की एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात किती अन्न खात असेल बरं. आम्ही तुम्हाला एक सत्य सांगितले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. अहवालानुसार, एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात सुमारे 35 टन (35000 किलो) अन्न खातो. पण या 35 टनांमध्ये आपण काय काय खालले ते देखील महत्त्वाचे असते. कारण आपण जे खातो ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? हे देखील तपासून पाहावे.
निरोगी आहाराच्या दिशेने पहिले पाऊल
बरेच लोकांना आरोग्यासाठी चांगले अन्न खाण्याची आवड असते. पंरतू ते हवे तितके सोपे नाही. कारण अनेकांना मग फास्ट फूड, मिठाई आणि सोडा असलेले अन्न खाण्यापासून स्वतला रोखावे लागेल. पण हे नेहमीच शक्य होईल का हा प्रश्न आहे. आजूबाजूला ताजी फळे, भाज्या, अंडी आणि इतर खाद्यपदार्थांसाठी स्थानिक बाजारपेठेत जाऊन खरेदी करणे महत्त्वाचे आहे. असे का बरं.
तुम्ही तुमच्या स्थानिक स्टोअरमध्ये जाऊन खरेदी कराल तेव्हा फक्त दुकानाबाहेर ठेवलेल्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण स्टोअरच्या बाहेरील भागात ताजी फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस, डेली आणि बेकरी पदार्थ असतात. जी ताजी असतात तर आतील भागामध्ये पॅकेज केलेले, कॅन आणि बॅग असलेली उत्पादने असतात. त्यामुळे ताज खाण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्य आयुष्यात किती बदल दिसतो.