पेनाच्या टोपणावर छिद्र का असतं? वाचा
कधीतरी तुमचं लक्ष पेनाच्या टोपणावर एक छोटं छिद्र आहे याकडे वेधलं गेलं असेलच? होय तर याचं कारण सांगू शकाल का?
पेनचा वापर प्रत्येकाने केला असावा. पण कधीतरी तुमचं लक्ष पेनाच्या टोपणावर एक छोटं छिद्र आहे याकडे वेधलं गेलं असेलच? होय तर याचं कारण सांगू शकाल का? नसेल माहित तर आम्ही सांगतो. पेनच्या कॅपमध्ये छिद्र का आहे याचे कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
एक संकल्पना अशी आहे की पेन उघडताना आणि बंद असताना हे छिद्र हवेचा दाब समान ठेवते. परंतु ज्या पेनांचे झाकण दाबून बंद केले जाते त्यांना हे लागू होते. पेन फिरवून बंद करणाऱ्यांना हे लागू होत नाही. अनेकदा लोकांना असेही वाटते की झाकणात छिद्र आहे जेणेकरून निबची शाई कोरडी पडणार नाही. पण ही चूक आहे.
पेनाची टोपी चुकून तोंडात जाईल असाही एक धोका असतो. मोठ्यां व्यतिरिक्त लहान मुलेही अनेकदा पेन चावतात. यात मुलांनी चुकून पेनाची टोपी गिळण्याचा धोका असतो.
या सवयीमुळे पेनाच्या टोपीवर छिद्र करण्याचा विचार केला जात होता. पेनाच्या टोपीवरील छिद्राबद्दल बोलायचं झालं तर ते आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. हे आपलं गुदमरण्यापासून देखील संरक्षण करते.
चुकून घशात गेल्यास घसा बंद होऊ नये किंवा गुदमरून श्वास चालू ठेवू नये. अशावेळी चुकून कोणी पेन कॅप गिळली तर जीवाला असलेला धोका कमी होतो. आता पेनाच्या टोपीवर छिद्र का असतं हे आता तुम्हाला कळलं असेलच.