2600 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या इजिप्तमधील महिलेचा चेहरा पुन्हा तयार करण्यात आला! कारण ऐकून थक्क व्हाल!

Reconstructed face of female mummy died 7th century BC : वैज्ञानिकांनी 2600 वर्षापूर्वी मृत पावलेल्या महिलेच्या ममी द्वारे तिचा चेहरा तयार केलेला आहे. या वैज्ञानिकांनी या महिलेचा चेहरा कशा पद्धतीने तयार केला आणि या चेहऱ्यासोबत जोडल्या गेलेला नेमक्या कोणकोणत्या कथा आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

2600 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या इजिप्तमधील महिलेचा चेहरा पुन्हा तयार करण्यात आला! कारण ऐकून थक्क व्हाल!
Scientists reconstructed the face of female mummy (फोटो साभार: डेलीमेल)
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 5:06 PM

मुंबई : वैज्ञानिकांनी 2600 वर्षापूर्वी मृत पावलेल्या महिलेच्या ममी द्वारे तिचा चेहरा तयार केला आहे. शारीरिक संरचनाच्या आधारावर या महिलेचा जन्म अंदाजे 650 BC दरम्यान झाला असेल. वैज्ञानिकांनी 2600 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या एका महिलेचा ममी चेहरा तयार केलेला आहे. हा एक डिजिटल चेहरा आहे. या महिला ममीला 1819 मध्ये इजिप्त येथील सर्वात प्रसिद्ध शवाघरमध्ये सांभाळून ठेवण्यात आले होते. हे शवा घर इजिप्तमध्ये (Egypt) असणाऱ्या नाईल नदीच्या (Nile river) पश्चिम किनाऱ्यावर होते. 1820 मध्ये या ममीला स्वित्झरलंड ( Switzerland) येथे संशोधन करण्यासाठी शिफ्ट करण्यात आले. ममी मध्ये सापडलेल्या महिला अंशच्या आधारावर अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील (Brazil) येथील तज्ज्ञ वैज्ञानिक यांनी मिळून तिचा चेहरा तयार केला. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, ही महिला त्या काळातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या महिलांपैकी एक होती.

या महिलेचा चेहरा FAPAB रिसर्च सेंटर, ऑस्‍ट्रेलिया येथील फ्लाइंडर्स युनिव्हर्सिटी आणि ब्राझीलचे 3डी डिजाइनर सीरो मोरेस यांनी मिळून तयार केला आहे. 3डी डिजाइनर सीरो मोरेस यांनी आधी सुद्धा जीसस क्राइस्ट आणि मेरी मॅग्डालेने यांचे चेहरे बनवले होते.

या वैज्ञानिकांनी कशाप्रकारे 2600 वर्षांपूर्वी मृत पावलेल्या महिलेचा चेहरा तयार केला याबद्दल अशा कोणत्या घटना समोर आल्या आणि सांगाडाद्वारे कशी मदत मिळाली जाणून घ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे…

अशा प्रकारे बनवला गेला सुंदर महिलेचा चेहरा

डेलीमेलच्या रिपोर्ट नुसार या तज्ज्ञ मंडळींनी अनेक महिन्यापर्यंत स्विझरलँड मध्ये ममी ठेवली होती आणि या ममीवर मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात आले आणि सांगाडा च्या सहाय्याने शारीरिक संरचना संबंधित संपूर्ण माहिती एकत्र करण्यात आली आणि त्यानुसार संशोधन करण्यात आले.

तज्ञ मंडळींचे म्हणणे आहे की, अनेक तपासणी केल्यानंतर समोर आलेली माहिती अत्यंत उपयुक्त ठरली त्याचबरोबर ही महिला त्या काळातील सर्वात सुंदर दिसणाऱ्या महिलांपैकी एक होती. तिचे डोळे भुरे होते आणि तिचे दात थोडेसे बाहेर निघाले होते अशा प्रकारे तिची चेहरा पट्टी दिसण्यासाठी खूपच आकर्षक होती.

या तज्ञ मंडळीच्या टीम असे म्हणणे असे आहे की, 1820 मध्ये जेव्हा या ममीचा शोध घेण्यास सुरुवात झाली होती तेव्हा या ममीचे दात सुरक्षित म्हणजे चांगल्या अवस्थेत सापडले होते यामुळे या दातांच्या मदतीने या ममीचा चेहरा बनवण्यासाठी खूपच मदत झाली.टीमने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चेहऱ्यावरील एकेक लेयर बनवण्यास सुरुवात केली आणि हळूहळू संपूर्ण चेहरा बनवला.

शाही कुटुंबातील होती ही महिला

ममी द्वारे जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार ही महिला एका शाही कुटुंबातील होती, असे प्राथमिक स्वरूपातील तथ्येनुसार निदर्शनास आले. ही 7 व्या शताब्दी मधील महिला होती जी शिकलेली होती. तज्ञ मंडळी यांचे म्हणणे असे आहे की,ही महिला इजिप्तच्या थेबेस शहरातील एका पुजाऱ्याची मुलगी होती खरतर या महिलेचे नाव काय होते? ही महिला नेमके काय काम करायची आणि तिला मुलं होते की नव्हती याबद्दलची विशेष अशी काही माहिती उपलब्ध झाली नाही..

नैसर्गिकरित्या बनवली गेली आहे चेहरेपट्टी

फ्लाइंडर्स यूनिवर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. माइकल यांचे म्हणणे आहे की या ममीच्या संरचनाच्या आधारावर अंदाज लावण्यात आलेला आहे कि या महिलेचा जन्म 650 BCच्या दरम्यान झाला असेल. ममी मध्ये या महिलेचा कान सुद्धा सुरक्षित म्हणजे चांगल्या स्थितीत सापडला आहे.या कानाचा आकारा पाहूनच आम्ही हुबेहूब दिसणारा कान बनवलेला आहे.

ज्या पद्धतीने आपण अन्य चेहरा बनवत असतो त्या पद्धतीने या महिलेचा चेहरा बनवण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे ज्वेलरी कपडे किंवा विगचा वापर केला नाही.

इतर बातम्या

माहेर बाई हक्काचं! 1956 पूर्वीच्या मालमत्तेतही मुलीचा वारसा हक्क मान्य, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण विकाल

तुम्ही किती वर्ष जगाल हे तुमच्या डोळ्यांद्वारे कळेल, ऑस्‍ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केला आहे दावा !!

मासिक पाळीच्या दिवसात तू अल्कोहोलचं सेवन करतेय…थांब मग जरा, हे केल्याने शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घे…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.