GK Quiz | परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता?
SSC , Banking, Railway आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील.
मुंबई: आजच्या काळात कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सची खूप गरज असते हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या परीक्षांदरम्यान यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. आपण खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचावीत. उत्तरं आली नाहीत तरी हरकत नाही आम्ही खाली सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
प्रश्न 1 – केळी हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे?
उत्तर – केळी हे कंबोडिया देशाचे राष्ट्रीय फळ आहे.
प्रश्न 2 : राष्ट्रपती भवनात किती खोल्या आहेत?
भारताच्या राष्ट्रपती भवनात एकूण 340 खोल्या आहेत.
प्रश्न 3 – कोणत्या देशाने सर्वप्रथम पाण्यातले जहाज बांधले?
उत्तर – ब्रिटन ने सर्वात आधी जहाज बांधले.
प्रश्न 4: कोणत्या देशात रविवारची सुट्टी नाही?
उत्तर – येमेन या देशात रविवारी सुट्टी नाही.
प्रश्न 5 : असा कोणता देश आहे जिथे ATM चा वापर केला जात नाही?
उत्तर : इरिट्रिया हा एक असा देश आहे जिथे ATM मशिनचा वापर केला जात नाही.
प्रश्न 6: मासे नाकाऐवजी कशाच्या मदतीने श्वास घेतात?
उत्तर मासे श्वास घेण्यासाठी त्यांच्या गिल्सचा वापर करतात.
प्रश्न 7 : परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर – जगातील पहिली परीक्षा चीनमध्ये सुरू झाली.
प्रश्न 8 : खाण्या-पिण्याशिवाय सुमारे ८ महिने जगू शकणारा जीव कोणता आहे?
उत्तर- कोळी
प्रश्न 9 – कोणत्या देशात निळ्या रंगाची जीन्स घालण्यावर बंदी आहे?
उत्तर कोरिया हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे निळ्या रंगाची जीन्स घालण्यावर बंदी आहे.
प्रश्न 10 – कोणते फळ पिकण्यास सुमारे 2 वर्षे लागतात?
उत्तर – खरं तर अननस पिकायला साधारण 2 वर्षे लागतात