GK Quiz | डासांना दूर ठेवण्यासाठी घराबाहेर कोणतं रोप लावलं पाहिजे?
GK Quiz | एकवेळ तुम्हाला गणित आणि विज्ञानाचं ज्ञान कमी असलेलं चालतं पण करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज हे असे विषय आहेत ज्याचं ज्ञान तुम्हाला असायलाच हवं नाहीतर तुमच्या हुशारीला महत्त्व राहत नाही. पण खरं तर जीके हा विषय खूप मोठा आहे. तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येतीलच असं नाही.
मुंबई: जनरल नॉलेज हे खूप महत्त्वाचं असतं. कोणतीही परीक्षा असो, प्रवेश परीक्षा असो, सरकारी नोकरीसाठी परीक्षा असो, या विषयाचा एक पेपर असतोच असतो. त्यावर खरं समोरच्याची हुशारी मोजली जाते. एकवेळ तुम्हाला गणित आणि विज्ञानाचं ज्ञान कमी असलेलं चालतं पण करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज हे असे विषय आहेत ज्याचं ज्ञान तुम्हाला असायलाच हवं नाहीतर तुमच्या हुशारीला महत्त्व राहत नाही. पण खरं तर जीके हा विषय खूप मोठा आहे. तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं येतीलच असं नाही. कधी काही उत्तरं येतात तर कधी काही माहितच नसतात. आज आम्ही तुम्हाला असेच प्रश्न विचारणार आहोत. उत्तर आलं तर ठीक. नाहीच आलं तर त्याच्याखाली उत्तर दिलेलं आहेच.
प्रश्न 1 – जगातील सर्वात सुंदर मका कोणत्या देशात आढळतात?
उत्तर – जगातील सर्वात सुंदर मका (कॉर्न) अमेरिकेत आढळतात.
प्रश्न 2 – जगातील सर्वात जुने पिझ्झा शॉप कोणत्या देशात आहे?
उत्तर – जगातील सर्वात जुने पिझ्झा शॉप इटलीमध्ये आहे.
प्रश्न 3 – जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज कोणत्या देशाकडे आहे?
उत्तर – जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज अमेरिकेजवळ आहे.
प्रश्न 4 – भारताच्या कोणत्या राज्याला वीरांची भूमी म्हणतात?
उत्तर – भारताच्या राजस्थान राज्याला वीरांची भूमी म्हटले जाते.
प्रश्न 5 – खजूराचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता?
उत्तर – इजिप्तमध्ये सर्वाधिक खजूराची लागवड केली जाते.
प्रश्न 6 – भीक मागण्यास कोणत्या देशात तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते?
उत्तर – जपानमध्ये भीक मागण्याला तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते.
प्रश्न 7 – डासांना दूर ठेवण्यासाठी घराबाहेर कोणतं रोप लावले जाते?
उत्तर – घराबाहेर पुदिन्याचं रोप लावलं तर मच्छर पळून जातात.