‘या’ इमारतीत दडलंय शेकडो टन सोनं, 24 तास कमांडो तैनात; हेलिकॉप्टरवरून वॉच

भारताता सोन्याचा धूर निघायचा पण इथे अख्खी इमारत आहे. थोडं-थोडकं नव्हे शेकडो टन सोनं याठिकाणी ठेवलं आहे. विशेष म्हणजे 24 तास कमांडो तैनात असतात. या सोन्याच्या इमारतीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही सहजासहजी प्रवेश मिळत नाही. अशा ठिकाणी हा खजाना ठेवला जातो. त्याची सुरक्षा व्हाईट हाऊसपेक्षा अधिक मजबूत आहे. याविषयी विस्ताराने जाणून घ्या.

‘या’ इमारतीत दडलंय शेकडो टन सोनं, 24 तास कमांडो तैनात; हेलिकॉप्टरवरून वॉच
goldImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 1:27 PM

Fort Knox Gold: पूर्व भारतात सोन्याचा धूर निघत होता, असं म्हटलं जायचं. पण, सध्या कोणत्या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे, असं म्हणल्यास सांगता येणार नाही. पण, अमेरिकेकडे एक इमारत अशी आहे, ज्या ठिकाणी खूप कडक सुरक्षेत शेकडो टन सोनं सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेतील फोर्ट नॉक्स या इमारतीत हे सोनं आहे. हे एक केंटकीमधील लष्करी तळ आहे.

फोर्ट नॉक्स इमारत

फोर्ट नॉक्स हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते. सुपर पॉवर अमेरिका आपल्या देशातील सोन्याचा मोठा साठा येथे ठेवते. बराच लांब आहे. कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या इमारती आहेत. ज्यामध्ये लष्कर आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. हे लोक या इमारतीचे रक्षण करतात. येथेच एका इमारतीच्या आत तिजोरी आहे. ज्यामध्ये शेकडो टन सोने ठेवण्यात आले आहे.

फोर्ट नॉक्समध्ये किती सोनं?

युनायटेड स्टेट्स मिंटच्या अहवालानुसार, फोर्ट नॉक्सकडे सध्या सुमारे 14.7 दशलक्ष औंस सोने आहे. त्याचे टनात रूपांतर केल्यास सुमारे 4 हजार 175 टन सोने ठेवले जाते.

फोर्ट नॉक्समध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी

फोर्ट नॉक्समध्ये फक्त सोनं नाही तर याशिवाय मूळ अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा, गुटेनबर्गचे बायबल आणि अमेरिकन राज्यघटनेची मूळ प्रत अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीही आहेत.

सोनं कसं ठेवलं जातं?

फोर्ट नॉक्समध्ये सोने बार स्वरूपात ठेवले जाते. याला बुलियन असेही म्हणतात. हे 99.5 टक्के शुद्ध सोने आहे. प्रत्येक बारचे वजन सुमारे 12.5 किलो किंवा 27.5 पौंड असते. अमेरिकन मानकांनुसार याची लांबी 7 इंच आणि रुंदी 3.5 इंच आहे. ठराविक वजन आणि आकारमानानुसार हे बार पूर्णपणे शुद्ध सोने मानले जातात. लंडन बुलियन मार्केट असोसिएशनने (एलबीएमए) शुद्ध सोन्याचा हा मानक तयार केला, जो अमेरिकेनेही स्वीकारला आहे.

फोर्ट नॉक्स इमारतीचा इतिहास काय?

अमेरिकेचे पहिले युद्धसचिव हेन्री नॉक्स यांच्या नावावरून या इमारतीला नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर या जागेचा वापर लष्करी तळाऐवजी सोने साठवण्यासाठी केला जाऊ लागला. ही इमारत 16 हजार घनफूट ग्रॅनाईट आणि 4 हजार 500 यार्ड काँक्रीटपासून बनलेली आहे. यामध्ये हजारो टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. ही इमारत 1941 मध्ये पूर्ण झाली. या मुख्य इमारतीला युनायटेड स्टेट्स बुलियन डिपॉझिटरी म्हणतात.

सुरक्षा व्यवस्था कशी आहे?

फोर्ट नॉक्सच्या भिंती सुमारे 3 फूट जाडीच्या आहेत. तर, त्याचे मुख्य गेट 20 टन आहे. अपाचे हेलिकॉप्टरद्वारे या भागावर लक्ष ठेवले जाते. स्टीलचे कुंपण आणि भक्कम सुरक्षा यामुळे याला फोर्ट नॉक्स, असे संबोधले जाऊ लागले आहे.

सुरक्षेचे वेगवेगळे स्तर

फोर्ट नॉक्सच्या दरवाजाला 10 वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचा कॉम्बिनेशन कोड लावण्यात आला आहे. त्यांना स्वत:च्या कोडशिवाय इतर कर्मचाऱ्यांचे कोड माहित नसतात. फोर्ट नॉक्समध्ये अनेक सुरक्षा स्तर आहेत. यामध्ये सैनिक संरक्षण, तांत्रिक सुरक्षा आणि कमांडो सुरक्षा यांचा समावेश आहे. इमारतीच्या सुरक्षेत कोणताही भंग होऊ नये, यासाठी लष्करी तुकड्या वेळोवेळी गुप्त पद्धतीने बदलल्या जातात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.