Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय रेल्वेला 4G स्पेक्ट्रम वापरण्यास मिळणार, रेल्वेवर त्याचा काय परिणाम होणार?

केंद्रीय माहिती आणि प्रसारण प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारनं 4G स्प्रेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती दिली. (Indian Railway 4G spectrum)

भारतीय रेल्वेला 4G स्पेक्ट्रम वापरण्यास मिळणार, रेल्वेवर त्याचा काय परिणाम होणार?
भारतीय रेल्वे
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 5:54 PM

नवी दिल्ली: केंद्रीय माहिती आणि प्रसारण प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारनं 4G स्प्रेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती दिली. आतापर्यंत रेल्वे संदेशवहनासाठी 2G स्पेक्ट्रम वापरत होते. आता रेल्वेला 700 मेगा हर्टझ बँड दिला जाईल. रेल्वेला या निर्णयाचा फायदा होईल आणि सुरक्षा यावर फरक पडेल, असं सांगण्यात आलं आहे.( Government of India gave permission for 4G spectrum use for railway signal system)

अत्याधुनिक स्पेक्ट्रमच्या वापरामुळं रियल टाईम कम्युनिकेशन होणार आहे. ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन व्यवस्थेमुळे रेल्वे व्यवस्था मजबूत होणार आहे. रेल्वेला 4G स्पेक्ट्रम संदेशवहन प्रणाली विकसित करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम येत्या 5 वर्षात पूर्ण होईल.

दोन ट्रेन समोरासमोर येणार नाहीत

4G तंत्रज्ञानावर आधारित ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम वापरात येतईल. एटीपी सिस्टीमद्वारे रेल्वेचे होणारे अपघात टाळता येतात. कारण यामध्ये ट्रेन चालकाला अगोदर माहिती मिळते. दोन ट्रेनचा अपघात होण्याची शक्यता या सिस्टीममध्ये राहत नाही. एटीपी सिस्टीममध्ये कोणतीही ट्रेन सिग्नल जंप करु शकतात नाही. संकटाच्या वेळी सिग्नल मोडून ट्रेनला पुढं जाता येत नाही. यामुळे ट्रेनच्या अतिवेगावर नियंत्रण ठेवलं जातं.

रेल्वे अपघात रोखले जाणार

एटीपी यंत्रणा सॅटेलाईटद्वारे नियंत्रित केली जाते. एखादी ट्रेन निश्चित वेगापेक्षा अधिक वेगानं धावतं असेल, धोक्याची सूचना मान्य करत नसेल तर सॅटेलाईट सिग्नल यंत्रणा एटीपी कंट्रोल रुमला माहिती देईल. या यंत्रणेत अँटी कॉलिजन टेक्नॉलॉजी देखील येईल. यामुळे दोन्ही ट्रेन एकमेकांना धडकणार नाहीत.

4G स्पेक्ट्रम रेल्वेला मिळाल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरु असताना संपर्क, नियंत्रण, प्रवासी माहिती, रेल्वेचं लाईव्ह लोकेशन, रेल्वे डब्यांचं निरीक्षण, इत्यादी कामं सुकर होणार आहेत. वाय फाय नेटवर्कमध्ये वाढ हेणार आहे. रेल्वेनं आतापर्यंत 6 हजार पेक्षा जास्त स्टेशनवर वाय फाय सेवा सुरु केली आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO | ट्रेन जेव्हा 100च्या स्पीडने असते तेव्हा केबिनमध्ये काय घडतं?, ड्रायव्हर कशी करतात गाडी कंट्रोल?, वाचा

SBI Alert : या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड, चेक करा तुमचेही नाव आहे का?

(Government of India gave permission for 4G spectrum use for railway signal system)

एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव.
वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम
वाडा तालुक्यात पाणीबाणी; पाण्यासाठी रात्रभर महिलांचा बोरिंगवर मुक्काम.
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष
भीम जयंतीचा उत्साह शिगेला; नांदेडमध्ये भीम अनुयायांचा जल्लोष.
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?.
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत.
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका.
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव.
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण.