Jagdamba sword : भारतातून इंग्लंडला कशी पोहचली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार?

Jagdamba sword : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख आणि जगदंबा तलवार परत केव्हा येईल, याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही जगदंबा तलवार इंग्लंडमध्ये कशी पोहचली. ही तलवार कोण घेऊन गेले. पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंबा तलवारीही ही कहाणी.

Jagdamba sword : भारतातून इंग्लंडला कशी पोहचली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार?
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 6:08 PM

नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२३ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख आणि जगदंबा तलवार भारतात परत येणार असल्याची चर्चा आहे. देशातील नागरिकांना मराठ्यांची शान असलेली जगदंबा तलवार केव्हा परत येणार याबाबत उत्सुकता आहे. आता ही जगदंबा तलवार केव्हा आणि कशी परत येणार हे भारत आणि इंग्लंड सरकार ठरवणार आहे. भारताचे इंग्लंडशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे जगदंबा तलवार परत येण्यास काही अडचण होईल, असे वाटत नाही. इंग्लंड सरकार ही जगदंबा तलवार परत करेल. परंतु, ही जगदंबा तलवार इंग्लंडला गेली कशी. कोण ही तलवार घेऊन गेलेत.

१८७५ ला सुरू होते कहाणी

जगदंबा तलवार इंग्लंडला जाण्याची कहाणी १८७५ शी संबंधित आहे. त्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड सप्तम डिसेंबर महिन्यात भारतात आले होते. ते जुन्या शस्त्रांचे शौकीन होते. वेगळी शस्त्र दिसली की ते आपल्याकडे जमा करत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी तेव्हाच्या महाराजांवर शस्त्र प्रिन्स ऑफ वेल्सला भेट देण्यासाठी दबाव निर्माण केला. इंग्रजांच्या प्रभावाखाली असल्याने महाराज त्या भेटवस्तू प्रिन्स ऑफ वेल्सला देत होते. त्या भेटीदरम्यान प्रिन्स ऑफ वेल्स यांना सुमारे पाचशे शस्त्र भेट देण्यात आले होते.

मुंबईचे कनेक्शन काय?

प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत पोहचले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार त्यांना भेट देण्यात आली. त्यावेळी महाराजांचे वंशज शिवाजी चतुर्थ होते. त्यांचे वय फक्त ११ वर्षे होते. त्यांनी जगदंबा तलवार प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली. भेट दिली त्यावेळी तलवार खूप खराब झाली होती. हिरे-माणिक उखडले होते. म्यानही नव्हती. शस्त्रागारात ही जगदंबा तलवार पडली होती. प्रिन्स ऑफ वेल्सला भेट देण्यापूर्वी या तलवारीला चमकवण्यात आले. हिरे-माणिक लावण्यात आले. म्यानही तयार करण्यात आली. त्यावेळी प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडमध्ये ही तलवार घेऊन गेले.

आता ती तलवार कुठं आहे? ‘

ही जगदंबा तलवार इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरीया यांच्या सेंट जेम्स पॅलेसमधील खासगी संग्रहालयात ठेवली आहे. दोन वर्षांपूर्वी याची माहिती झाली. महाराष्ट्र सरकार ही जगदंबा तलवार परत आणण्यासाठी इंग्लंड सरकारशी बोलणी करत आहेत. केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत २५० वस्तू इंग्लंडवरून परत आणण्यात आल्या.

कोण होते शिवाजी चतुर्थ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा संभाजी महाराज यांची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा राजाराम यांना छत्रपती उपाधी मिळाली होती. संभाजी आणि राजाराम भाऊ होते. शिवाजी चतुर्थ हे छत्रपती राजाराम यांचे वंशज होते.

'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?
फडणवीसांसह 'हे' मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?.
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य
शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा.., शिवसेनेच्या नेत्याच मोठं वक्तव्य.
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.