Explained: माणसंच नाही तर प्राणीही असतात गे आणि लेस्बियन! काय आहे समलैंगिक संबंधांचं लॉजिक?
अमेरिकेतल्या उत्तर केरोलिनात एका मालकानं आपल्या 5 वर्षाच्या कुत्र्याला घराबाहेर काढलं. घराबाहेर काढण्याचे कारण ऐकून अवाक् व्हाल. या घरातील कुत्रा समलैंगिक असल्यानं त्या कुत्र्याला घराबाहेर काढण्यात आलं होतं.
Homosexuality in Animals: समलैंगिक असणं हे नैसर्गिक असतं का? असा प्रश्न काहींना पडू शकतो. आपल्याकडे गे, लेस्बियन यांवरुन वेगवेगळ्या चर्चा होत असतात. गेल्या आठवड्यात अमेरिकेत एक घटना घडली. अमेरिकेतल्या उत्तर केरोलिनात एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षाच्या कुत्र्याला घराबाहेर काढलं. घराबाहेर काढण्याचे कारण ऐकून अवाक् व्हाल. या घरातील कुत्रा समलैंगिक असल्यानं त्या कुत्र्याला घराबाहेर काढण्यात आलं, असं सांगितलं जातंय. उत्तर केरोलिनातील शार्लोट या भागात फेज्को नावाच्या कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्यासोबत संबंध ठेवताना पाहिले गेलं होतं. माध्यमांमध्ये देखील हा विषय चर्चेचा ठरला होता. काही दिवसानंतर शेल्टर होम्सजवळ राहणाऱ्या एक समलिंगी (Gay Couple) जोडप्यानं या कुत्र्याला दत्तक घेतलं आणि त्याचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. स्टीव निकोल्स आणि जॉन विन्न असं या समलिंगी जोडप्याचं नाव आहे. या घटनेमुळे अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आले. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील समलिंगी संबंध ठेवतात? प्राणी असं का करत असतील? असे अनेक प्रश्न अनेकांना पडले आहेत. कुत्रे, माकडं, सिंह, हत्तीसारख्या इतर प्रजातींमध्येही गे (Gay) आणि लेस्बियन (Lesbian) प्रकार पाहायला मिळतो का? की असं काही नसतं? याचं उत्तर आता लोक शोधू लागले आहेत.
समाजात आजही समलैंगिक जोडप्यांना सहजासहजी स्वीकारले जात नाही. परंतु पाळीव प्राणी समलैंगिक असल्यामुळे त्यांचादेखील समाजाने स्वीकार केलेला नाही. जिथं माणसांना स्वीकारलं जात नाही, तिथं प्राण्यांना सहज स्वीकारलं जाईल, अशी शक्यताही धुसरच आहे. प्राणी समलिंगी संबंध का ठेवतात? माणसाप्रमाणे आपल्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणी असं कृत्य करतात का? की यामागे अजून काही कारण आहे? या प्रश्नांबाबत तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली आहे.
450 प्रजातींमध्ये आढळून आले समलैंगिक
1960 च्या दशकात ऑस्ट्रियाचे नोबेल पुरस्कार विजेते झूलॉजिस्ट कोनराड लॉरेंज (Zoologist Konrad Lorenz) यांनी अंदाजे 1,500 प्रजातीच्या प्राण्यांवर वेगळ्या प्रकारचं संशोधन केलं. आपल्या रिसर्चवर आधारित एकंदरीत 450 प्रजातीचे जीव हे समलेंगिक असतात, असे देखील त्यांनी म्हटलं. यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे डॉ. नॅथन बॅली यांनी 2004-05 मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या रिसर्च पेपर मध्ये देखील अशाच प्रकारची माहिती प्रकाशित केली होती.
पाळीव प्राण्यांमधील समलैंगिकता
पाळीव प्राण्यांमधील समलैंगिकतेबद्दल बोलायचे झाल्यास ही भावना हॉर्मोनशी निगडित आहे. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलामुळे प्राणीदेखील अशा प्रकारे वागू शकतात. असं निवृत्त प्रोफेसर आणि सीनियर वेटरनरी गायनॅकोलॉजिस्ट डॉ. जीएन पुरोहित यांनी म्हटलंय. गाय आणि कुत्र्यांसारख्या पाळीव प्राण्यांमध्ये देखील हार्मोन्स संबंधित डिसऑर्डर निर्माण होतात. प्राण्यांच्या शरीरातील एस्ट्रोजन हार्मोन्स वाढल्यानंतर प्राण्यांमध्ये होमोसेक्शुअलिटी दिसून येते. कुत्र्यांच्या शरीरामध्ये वयानुसार थायरॉईड हार्मोन समस्यादेखील उद्भवतात. या सगळ्या गोष्टी प्राण्यांच्या शरीरातील हार्मोन्स यांच्या असंतुलनामुळे देखील घडून येतात.
माकडांमध्ये अनेकदा होमोसेक्शुअलिटी दिसून येते. नर माकड आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी व आपल्या समूहाचे नेतृत्व करण्यासाठी माकडिणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असतो, असं जाणकार सांगतात. समूह प्रतिनिधी म्हणून वर्चस्व सिद्ध करण्यासाठी असं केलं जात असावं, असाही एक तर्क लावला जातो.
हत्तीण असतात लेस्बियन
हत्तींमध्ये देखील समलैंगिकता पाहायला मिळते. पण हत्ती गे नाहीतर लेस्बियन या प्रकारात आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. हत्तीण आपल्या समुहाची प्रमुख असते. हत्तीण दुसऱ्या हत्तीणीसोबत लैंगिक संबंध ठेवते. यामागील कारण देखील आपले वर्चस्व सिद्ध करणे हेच असते. या कारणामुळे हत्तीण लेस्बियन बनतात. इतर हत्तीणी अन्य हत्तींकडे जाऊ नये, यासाठी असं केलं जात असल्याचा अंदाज बांधला जातो. परंतु अनेकदा समुहातील प्रमुख हत्तींचा विरोध पत्करून आपला वंश वाढवण्यासाठी अनेक हत्तीणी नर हत्तीकडे आकर्षित होत असल्याचंही पाहण्यात आलं आहे.
इतर बातम्या
Pan card वापरुन भलत्याच कुणीतर कर्ज काढलं? अनेकांसोबत असं घडलंय, तुम्हीही वेळीच खात्री करुन घ्या!
आमदार मालामाल जनता कंगाल, राज्यातील आमदरांना काय काय मिळतं?
जर एखाद्या चित्रपटात चुकीची माहिती दाखवली गेल्यास काय करतात, कायद्याच्या आधारे करू शकता तक्रार!…