अखेर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं… पृथ्वीवर पाणी आलं कसं?; नव्या संशोधनातून आश्चर्यकारक उलगडा

पृथ्वीने स्वत: आपलं पाणी विकसित केल्याचं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. या नव्या संशोधनामुळे जुना सिद्धांत कालबाह्य ठरला आहे. नव्या सिद्धांतामुळे आता पाण्याचे आणखी स्त्रोत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अखेर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं... पृथ्वीवर पाणी आलं कसं?; नव्या संशोधनातून आश्चर्यकारक उलगडा
water in earth Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 8:05 PM

नवी दिल्ली : पृथ्वीवर पाणी कसं आलं? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. अखेर या प्रश्नाचं नवं उत्तर मिळालं आहे. अवकाशातून पृथ्वीवर पाणी आलं. त्याला लघूग्रह कारणीभूत होते, असं जुनं संशोधन सांगतं. मात्र, जुन्या संशोधनाला छेद देणारं नवं संशोधन पुढे आलं आहे. नव्या संशोधनानुसार जेव्हा ग्रहांची निर्मिती होत होती तेव्हा हायड्रोजन युक्त वायूमंडळ आणि मॅग्मा महासागरांच्या दरम्यान रासायनिक संपर्क झाला. त्यातून पाण्याचं अस्तित्व निर्माण झालं. या नव्या संशोधनामुळे आता पुढील अनेक संशोधनाची पायाभरणी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

नव्या संशोधनातून एक नवी माहिती पुढे आली आहे. ती म्हणजे पृथ्वीने स्वत:च स्वत:चं पाणी विकसित केलं. धूमकेतू किंवा लघूग्रहांनी शुष्क पडलेल्या पृथ्वीवर पाणी आणलं हा जुना सिद्धांत होता. नव्या संशोधनाने हा सिद्धांत खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. कार्नेगी सायन्सने हे नवं संशोधन केलं आहे. कार्नेगी सायन्सचे अनत शहर, यूसीएलएचे एडवर्ड यंग आणि हिल्के श्र्लिचिंग यांच्या नव्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

संशोधनाचा आधार काय?

हे संशोधन एक्सोप्लॅनेटवर आधारीत आहे. पृथ्वीच्या अस्तित्वाचा आरंभ मॅग्मा महासागर आणि अण्विक हायड्रोजन प्रोटो वायुमंडळाच्या परस्परातील संपर्क क्रियेतून मोठ्या प्रमाणात पाणी निर्माण झालं असं त्यातून स्पष्ट होतंय ग्रह निर्माण होण्याच्या लाखो वर्ष आधी वायूमंडळ होतं हे आम्हाला एक्सोप्लॅनेटच्या संशोधनातून आढळून आलं. त्यात अण्विक हायड्रोजन आणि H2 असणं ही सामान्य बाब होती, असं अनत शहर यांनी सांगितलं.

अवकाशातून पृथ्वी पाणी आल्याचा सिद्धांत चुकीचा असल्याचं हे हा अभ्यास सांगतो. लघुग्रहाच्या हल्ल्यातूनच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचा दावा चुकीचा निघाला आहे. नेचर अॅस्ट्रॉनॉमी नियतकालिकात प्रसिद्ध अभ्यासात एक सल्ला दिला आहे. बाष्पशील आणि जैविकरित्या समृद्ध सी-प्रकारच्या लघुग्रह पृथ्वीवरील पाण्याच्या स्त्रोतापैकी एक असू शकतात असं या नियतकालिकातील अभ्यासात म्हटलं आहे.

दूरवर ताऱ्यांची प्रदक्षिणा करणाऱ्या साधारण एक्सोप्लॅनेटचा अभ्यास करण्यात आला. त्यातून विकसित ग्रह बनविण्यासाठी धडक देणाऱ्या डोंगराचा परिसर पूर्णपणे शुष्क होता. मात्र अण्विक हायड्रोजन वातावरण आणि मॅग्मा महासागराच्या परस्पर संपर्कामुळे पाणी निर्माण झालं हे जेव्हा समजलं तेव्हा पाण्याचे आणखीही स्त्रोत असू शकतात याची शक्यता निर्माण झाली. मात्र, पृथ्वीच्या वर्तमान परिस्थितीची व्याख्या करण्यासाठी हे पुरेसे नाही हे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.