एकेकाळी ख्रिश्चन देश असलेला लेबनॉन मुस्लीम देश कसा बनला?

लेबनॉन हा देश काही दशकांपूर्वी ख्रिश्चन देश होता. मुस्लीम देशांमध्ये तो एकटा गैर मुस्लीम देश होता. तर बाजुला इस्रायल हा ज्यु देश होता. पण मुस्लीम देशांची संख्या अधिक होती. पण ७० टक्के ख्रिश्चन देश मुस्लीम देश कसा बनला. गृहयुद्धात शेजारील देशांनी कशा प्रकारे भूमिका बजावली जाणून घ्या.

एकेकाळी ख्रिश्चन देश असलेला लेबनॉन मुस्लीम देश कसा बनला?
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 6:03 PM

इस्रायल आणि लेबनॉनमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहवर इस्रायलच्या लष्कराने कारवाई करत त्यांचा प्रमुख देखील ठार केला आहे. इस्रायलकडून हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. या कारवाईत आतापर्यंत अनेक हिजबुल्लाहचे सैनिक ठार झाले आहेत. ही कारवाई सुरुच राहणार असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. पण तुम्हाला माहित आहे की, सध्या अनेक अतिरेकी गटांचा गड असलेला लेबनॉन हा काही दशकांपूर्वी ख्रिश्चन देश होता. हा इतिहास खूप मागचा नाही. इथल्या संसदेतही जवळपास ६० टक्के जागा ख्रिस्ती नेत्यांसाठी राखीव होत्या. पण मग असे काय घडले की, तो मुस्लीम बहुसंख्य कसा झाला. आजह लेबनॉन इस्लामिक देश कसा झाला आहे.

९० वर्षांपूर्वी शेवटची जनगणना

पन्नासच्या दशकात, लेबनॉनमध्ये 70 टक्के लोकं हे ख्रिश्चन होते, तर फक्त 30 टक्के लोकं हे मुस्लीम आणि इतर धर्मांचे होते. या देशात शेवटची जनगणना 1932 मध्ये झाली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार, आता या देशात जवळपास ७० टक्के लोकं हे मुस्लीम आहेत. ज्यामध्ये शिया, सुन्नी आणि इस्लामिक लोकांचा समावेश आहे. तर उर्वरित लोकसंख्या ख्रिश्चन आणि इतर धर्माची आहे.

व्यापारासाठी मोठी बाजारपेठ

सन 1970 पर्यंत मध्यपूर्वेतील लेबनॉन हा एकमेव देश होता जो मुस्लीम देश नव्हता. तर इस्रायल हा ज्यू देश आहे. लेबनॉनची राजधानी बेरूतला पूर्वेचे पॅरिस म्हटले जात होते. आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील देशातून हे शहर व्यापाऱ्यासाठी जोडले गेले होते. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातूनही हे शहर खूप महत्त्वाचे होते. येथून विविध प्रकारचे व्यापारी परदेशात व्यापार करायचे.

येथे प्रमुख पदांवर सुमारे ६० टक्के लोकं ख्रिश्चन धर्माचे होते. त्यामुळे मुस्लीम जनतेमध्ये असंतोष वाढू लागला. त्यांना देशात समान वाटा हवा होता. त्यामुळे अनेक ख्रिश्चनांनी त्यांचा धर्म बदलला. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑनलाइन अहवालात धर्मांतरानंतर दुसऱ्या धर्मात परतणे सोपे नव्हते, असा उल्लेख आहे. असे प्रयत्न करणाऱ्या अनेक गटांना ईशनिंदेच्या आरोपाखाली कठोर शिक्षा झाली.

गृहयुद्धात शेजारील देशांची उडी

20 व्या शतकाच्या सुरुवातीला धार्मिक समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. लेबनॉनमध्ये गृहयुद्ध सुरु झाले. या युद्धात ख्रिस्ती आणि मुस्लिम आमनेसामने आले. सत्तर ते नव्वदच्या दशकापर्यंत हे युद्ध सुरु राहिले. लेबनॉनच्या ख्रिश्चन लोकसंख्येला प्रथमच त्यांची कमजोरी जाणवली. मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी लोकं देखील त्यांच्या देशात आश्रय घेत होते. पण लढाईत ते ख्रिश्चनांच्या विरोधात उभे राहिले. स्वतंत्र पॅलेस्टाईनचा अजेंडा घेऊन ते इस्रायलला चिथावणी देत ​​राहिले. त्यामुळे इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनवर अनेकवेळा हल्ले केले.

देशांतर्गत युद्धात शेजारील देशांनीही उडी घेतली. सीरिया आणि इराक या मुस्लीम देशांनी मुस्लीम गटांना पाठिंबा दिला. इस्रायलने ख्रिश्चन गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर हिजबुल्लाह, अल-अमल आणि मुस्लीम सोशलिस्ट पार्टी असे अनेक अतिरेकी गट तयार झाले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.