माणसाची कडक ऊन सहन करण्याची क्षमता किती?, किती ऊन लागल्यावर मृत्यू?, तुम्हाला हे माहितीच हवं
Temperature: यंदा सूर्य जण आकाशातून आग ओकत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाने 40 ओलांडून 45 अंशाकडे धाव घेतली आहे. काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशावेळी आपले शरीर किती तापमान सहन करु शकते? तुम्हाला माहिती आहे का?
जगभरातील अनेक भागात हवामान बदलामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक लोकांना हा उन्हाळा असह्य झाला आहे. देशातील अनेक भागात उष्णतेने रेकॉर्ड मोडले आहेत. उष्णतेच्या झळांनी दिवसाच नाही तर रात्री पण घरातून बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे मनुष्याचे शरीर किती तापमान सहन करु शकते? असा प्रश्न तुमच्या मनात पण आला असेलच. काय आहे त्याचे उत्तर?
किती तापमान सहन करु शकते मानवी शरीर?
शास्त्रज्ञांच्या मते, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे 98.9 डिग्री फॉरेनहाईट असते. ते आपल्या जवळपासच्या वातावरणात म्हणजे बाहेरील तापमानाच्या 37 डिग्री सेल्सिअस इतके असते. विज्ञानाच्या मते, मानवीय शरीरातील रक्त उष्ण असते. मनुष्य 42 डिग्री सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करु शकतो. मनुष्याच्या शरीरात एक खास तंत्र ‘होमियोस्टॅसिस’ असते. ते मनुष्याला या तापमानात पण सुरक्षित ठेवते.
हे तापमान ठरु शकते घातक
42 डिग्री तापमानात कोणताही मनुष्य जीवित राहू शकतो. तर यापेक्षा अधिकचे तापमान मनुष्याच्या शरीरासाठी नुकसानदायक असते. लंडन स्कूल ऑफ हायजीनच्या एका अहवालानुसार, , 2050 पर्यंत उष्णतेने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 257 टक्क्यांपर्यंत वृद्धी होऊ शकते. विज्ञानानुसार, मनुष्य 35 ते 37 डिग्री तापमान कोणत्याही त्रासाशिवाय सहन करु शकते. पण हेच तापमान 40 डिग्रीवर पोहचते, तेव्हा लोकांना अडचण येते. याविषयीच्या अनेक संशोधनानुसार, मनुष्यासाठी 50 डिग्रीपेक्षा अधिकचे तापमान सहन करणे एकदम अवघड असते.
जर तापमान यापेक्षा अधिक वाढले तर ते जीवाला धोकादायक असते. मेडिकल जर्नल लँसेटच्या एका अहवालानुसार, वर्ष 2000-04 आणि 2017-2021 या दरम्यान 8 वर्षांत भारतात भयंकर उष्णतेची लाट आलेली आहे. तर उष्माघातामुळे मरणाऱ्यांची संख्या 55 टक्क्यांनी वाढली आहे.
कधी आणि कशी उष्णता ठरु शकते जीवघेणी?
आरोग्य तज्ज्ञानुसार, जर पारा 45 डिग्री असेल तर चक्कर येणे, बेशुद्धी, अस्वस्थता सारख्या तक्रारी वाढतात. त्यामुळे रक्तदाब कमी होण्याची भीती वाढते. जर तापमान 48 ते 50 डिग्री वा त्यापेक्षा अधिक असेल तर मनुष्याचे शरीर कार्य करणे थांबविते. त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो.