Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IFS Officer: परदेशात पोस्टिंग, घर, गाडी, नोकर आणि लाखोंचा पगार, कुठली आहे ही सरकारी नोकरी?

सरकार नोकरी मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. पण सगळ्यांनाच यात यश मिळत नाही. यूपीएससी परीक्षा देखील आयपीएस किंवा आयएएस अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं पण याशिवाय आणखी एक प्रतिष्ठेची नोकरी म्हणजे आयएफएस अधिकारी होणे. जाणून घ्या कसे बनता येते आयएफएस अधिकारी.

IFS Officer: परदेशात पोस्टिंग, घर, गाडी, नोकर आणि लाखोंचा पगार, कुठली आहे ही सरकारी नोकरी?
IFS officer
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 7:04 PM

IFS Officer salary : अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. पण सगळ्यांनाच ती मिळते असे नाही. अनेक नोकऱ्या अशा आहेत ज्यात अनेक सोयी मिळतात. पण ती मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशीच एक नोकरी म्हणजे भारतीय परराष्ट्र सेवेची नोकरी. भारतात IAS किंवा IPS होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण त्यासोबत IFS अधिकारी देखील मोठी जबाबदारीचे पद आहे. आयएफएस अधिकारी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत असतात. परराष्ट्र सचिव हे आयएफएस अधिकाऱ्यांचे प्रमुख असतात.

आयएफएस अधिकाऱ्यांचे काम हे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचे स्थान मजबूत करणे  हे आहे. भारताव्यतिरिक्त जगातील विविध देशांमध्ये IFS अधिकारी नियुक्त केले जातात. ते इतर देशांमध्ये भारताचे मुत्सद्दी म्हणून काम करतात. ज्या देशात त्यांना पोस्टिंग दिली जाते त्या देशासोबत भारताचे संबंध चांगले करण्याची जबाबदारी त्यांची असते.

IFS अधिकाऱ्याचा पगार किती

परदेशात नियुक्ती होत असल्याने हे पद खूप महत्त्वाचे असते. या नोकरीत इतरही अनेक फायदे आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे पद आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका IFS अधिकाऱ्याला सुमारे 60,000 रुपये प्रारंभिक पगार दिला जातो. तर परदेशात पोस्टिंग केल्यावर त्यांना 2.5 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. याशिवाय, एखाद्या IFS अधिकाऱ्याचा पगार संबंधित देशाच्या क्रयशक्तीवरही अवलंबून असतो, जसे महागड्या देशांमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांना जास्त पगार दिला जातो.

भत्ते आणि सुविधा

पगारासह, IFS अधिकाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे, प्रवास भत्ता इत्यादींसह इतर अनेक भत्ते दिले जातात. याशिवाय त्यांना घर, कार, वैयक्तिक कर्मचारी आणि रक्षकही दिले जातात. याशिवाय या अधिकाऱ्यांना वैद्यकीय लाभ, पेन्शन, मोफत फोन कॉलची सुविधाही दिली जाते.

IFS अधिकारी कसे व्हावे

IFS अधिकारी होण्यासाठी तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. जी सर्वात कठीण परीक्षेपैकी एक आहे. यासाठी २१ ते ३२ वयोगटातील पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. परीक्षेअंतर्गत प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू असा तीन परीक्षा पास व्हाव्या लागतात. UPSC परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्यांनाच IFS मध्ये जाण्याची संधी मिळते.

सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला
सेन्सॉर बोर्डाची मानसिकता...'फुले' सिनेमावर आक्षेप, जयंत पाटलांचा टोला.
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला
संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ न्यायालयात दाखवला.
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप
'ऐपत नव्हती तर..', एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून वडेट्टीवारांचा संताप.
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
ताई - दादांमध्ये जुंपली; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला.
MSRTC : '... अन्यथा आंदोलन करणार', एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक पवित्रा
MSRTC : '... अन्यथा आंदोलन करणार', एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक पवित्रा.
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.