चित्रपटांमध्ये गोळी पाठीवर लागो वा छातीवर, रक्त तोंडातूनच का येतं? वाचा या मागचं कारण…

अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये आपण बर्‍याचदा पाहिले असेलच की, जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीवर गोळी झाडते, तेव्हा गोळी कुठेही लागो रक्त त्याच्या तोंडातूनच रक्त येते. असा रक्तस्त्राव होण्यामागील नेमकं कारण काय आहे?

चित्रपटांमध्ये गोळी पाठीवर लागो वा छातीवर, रक्त तोंडातूनच का येतं? वाचा या मागचं कारण...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 2:29 PM

मुंबई : जगभरात चित्रपटप्रेमींची कमतरता नाही. मनोरंजनाच्या बाबतीत आपला देश इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अजिबात मागे नाही. तथापि, चित्रपटांमध्ये रस नसलेल्या लोकांची संख्या देखील लक्षणीय आहे. असे असूनही, अनेक लोक सिनेमा हॉलमध्ये जाऊन किंवा घरी टीव्हीवरच काही चित्रपट नक्कीच पाहतात. जगभरातील मनोरंजन विश्वात रोमँटिक चित्रपट, विनोदी चित्रपट, भयपट, अ‍ॅडव्हेंचर फिल्म, अ‍ॅक्शन फिल्म इत्यादी श्रेणीत अनेक चित्रपट तयार केले जातात. या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण असूनही, बहुतेक लोकांना रोमँटिक आणि अ‍ॅक्शन चित्रपट पहायला आवडतात (In movies why does the bullet hit the back or the chest and the blood comes out of the mouth Read the reason behind this).

जर, तुम्हाला देखील चित्रपटांचा शौक असेल तर तुम्हीसुद्धा बरेच अ‍ॅक्शन चित्रपट पाहिले असतील. अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये आपण बर्‍याचदा पाहिले असेलच की, जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीवर गोळी झाडते, तेव्हा गोळी कुठेही लागो रक्त त्याच्या तोंडातूनच रक्त येते.

शरीराच्या इतर भागावर गोळी लागल्यानंतरही रक्त तोंडातूनच का बाहेर येते?

आज आपण येथे चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या अशाच एका दृश्यावर बोलणार आहोत. चित्रपटात एखाद्या व्यक्तीला गोळी मारल्यानंतर त्या व्यक्तीला रक्तस्त्राव होण्यामागील नेमकं कारण काय आहे? चित्रपटातील मारहाण दृश्यात एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर किंवा छातीवर कुठेही गोळी लागली, तरी रक्त मात्र त्याच्या तोंडातूनच येत असते.

कदाचित आपण कधी याकडे विशेष लक्ष दिले नसेल किंवा त्या मागची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसेल. पण, आज आम्ही तुम्हाला चित्रपटात दाखवलेल्या अशा दृश्यांचे सत्य सांगणार आहोत, जे तुमच्या मनातील अनेक शंकांचे निरसन करेल. लंडनमधील 15 वर्षांच्या यास्मिनने याबाबत प्रश्न विचारला होता. यास्मीनच्या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. नीशा मानेक म्हणाल्या की, बहुतेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेही शक्य आहे, परंतु आपल्या चित्रपटांमध्ये तुम्ही जे पाहता ते प्रत्यक्षात संभव नाही (In movies why does the bullet hit the back or the chest and the blood comes out of the mouth Read the reason behind this).

तोंडातून का आणि केव्हा रक्त येते?

सायन्स फोकसवर प्रकाशित झालेल्या डॉ. नीशा मानेक यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, पोटात जखमा झाल्यामुळे एखाद्याला रक्ताच्या उलट्या होऊ शकतात. अशा परिस्थितीस हाइमेटमेसिस म्हणतात. त्यांनी सांगितले की सहसा रक्ताचा प्रवाह शरीरात होतो आणि पोटामध्ये जमा होतो. त्याचप्रमाणे, फुफ्फुसात रक्तस्त्राव झाल्यामुळे, खोकला असताना एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून रक्त बाहेर पडू शकते. अशा परिस्थितीस हेमोप्टिसिस म्हणतात.

या व्यतिरिक्त, तोंडाला दुखापत झाल्यामुळे लोक लाळेद्वारे रक्त थुंकू शकतात. डॉ. नीशा म्हणाल्या की, चित्रपटात दाखवले गेलेले हिंसक देखावे केवळ शूटिंग पुरते मर्यादित असतात. एखाद्याला गोळी लागल्यानंतर तोंडातून बाहेर पडते, ते केवळ नाट्यमय प्रभावांसाठी केले जातात आणि त्यात फारसे सत्य नाही.

(In movies why does the bullet hit the back or the chest and the blood comes out of the mouth Read the reason behind this)

हेही वाचा :

Controversy | ‘बबिता जीं’च्या अडचणी आणखी वाढल्या, ‘तो’ वादग्रस्त शब्द वापरल्याने FIR दाखल!

PHOTO | अवघ्या तीन महिन्यांचा ‘हा’ स्टारकिड इन्स्टाग्रामवर सक्रिय, फॉलोअर्सच्याबाबतीत बड्या कलाकारांना देतोय टक्कर!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.