कोणत्या देशात निळी जीन्स घालण्यावर पूर्णपणे बंदी, तुम्हाला माहितीये नाव?
जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहित नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का की, एक असा देश आहे जिथे जीन्स घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे. जगात आता जीन्स घालणं हे फॅशन झाली आहे. अनेक लोकं जीन्सचे मोठे फॅन आहेत. पण या देशात जीन्सवरच बंदी का घालण्यात आली आहे जाणून घ्या.
सामान्य ज्ञान असणं ही आता काळाजी गरज आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान असून आता उपयोग नाही. कारण जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर तुम्हाला इतर ज्ञान ही असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी किंवा समाजात तुम्ही किती हुशार आहात हे तुमच्याकडे असलेल्या ज्ञानावरुन ठरवले जाते. सामान्य ज्ञान खूपच महत्त्वाचे आहे. यामुळे अनेक गोष्टी आपल्याला कळतात. सामान्य ज्ञानात जर तुम्हाला भर पाडायची असेल तर तुम्हाला वाचन करावे लागले. नवीन गोष्टी जाणून घ्याव्या लागतील.
तुम्हाला माहित आहे का, कोणत्या देशात निळ्या जीन्स घालण्यावर बंदी आहे? याचं उत्तर आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरियाचे लोक निळ्या जीन्स घालू शकत नाहीत. जीन्स हे अमेरिकन साम्राज्यवादाचे प्रतीक मानले जाते आणि उत्तर कोरिया हा अमेरिकेचा कट्टर शत्रू आहे. पूर्वी जीन्स निळ्या रंगाची असायची, त्यामुळे आजही निळ्या जीन्सवर या देशात बंदी आहे.
उत्तर कोरिया आणि अमेरिकेत गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचा दुसरा शत्रू रशिया हा उत्तर कोरियाचा जवळचा देश मानला जातो. काही महिन्यांपूर्वीच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला होता. हा असा देश आहे जिथे खूप कमी लोकं जातात.
एकीकडे युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरु असताना उत्तर कोरियाचा शासक किम जोंग याने रशियाला हजारो सैनिक पाठवले आहे. दुसरीकडे अमेरिका हा युक्रेनला मदत करत आहे. अमेरिकेने रशियाच्या विरोधात आपली क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्याने रशिया आणखी आक्रमक झाला होता. पुतिन यांनी यानंतर अमेरिकेला धमकी देखील दिली होती.
रशिया हा उत्तर कोरियाला मदत करत असतो. याआधी रशियाने उत्तर कोरियाला S-400 हवाई संरक्षण प्रणाली दिली होती. जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे. उत्तर कोरियाचा शासक किम जोंग हा नेहमीच अमेरिकाविरोधी कारवायांमध्ये गुंतलेला असतो.