Indian Railways : कसं ठरवलं जातं ट्रेनच नाव? 99 % लोकांना माहित नाही रेल्वेचा हा फॉर्म्युला

Indian Railway Rule: इंडयिन रेल्वेकडे 9 हजार मालगाडया, 13 हजार रेल्वे गाडया आणि 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत. सध्या भारतीय रेल्वेचा, प्रवासी सुविधा वाढवण्यावर आणि रेल्वेच्या आधुनिकी करणावर जोर आहे.

Indian Railways : कसं ठरवलं जातं ट्रेनच नाव? 99 % लोकांना माहित नाही रेल्वेचा हा फॉर्म्युला
smallest name of railway station Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 12:35 PM

Indian Railway : देशभरात दररोज लाखो-कोट्यवधी लोक भारतीय रेल्वेतून प्रवास करतात. भारतीय रेल्वे या सर्व प्रवाशांना इच्छित ठिकाणी पोहोचवण्याच कार्य करते. सध्या भारतीय रेल्वे 11 हजार ट्रेन्सच संचालन करतेय. भारतीय रेल्वे जगातील मोठ्या रेल्वे नेटवर्क्सपैकी एक आहे. रेल्वे नेटवर्क्समध्ये भारतीय रेल्वे जगात चौथ्या आणि आशियात दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय रेल्वेकडे 9 हजार मालगाडया, 13 हजार रेल्वे गाडया आणि 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत. सध्या भारतीय रेल्वेचा, प्रवासी सुविधा वाढवण्यावर आणि रेल्वेच्या आधुनिकी करणावर जोर आहे. भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन्सना नावं कशी दिली जातात? या बद्दल तुम्हाला माहित आहे का?

ट्रेन्सना नाव देण्यासाठी रेल्वेचा फॉर्म्युला

भारतीय रेल्वेमध्ये प्रत्येक ट्रेनच एक नाव आहे. त्यासाठी रेल्वेचा एका फॉर्म्युला आहे. ट्रेन जिथून सुरु होते आणि प्रवास जिथे संपतो, त्या ठिकाणाची नावं दिली जातात. उदहारणार्थ चेन्नई-जयपूर एक्सप्रेस, कोटा-पटना एक्सप्रेस. त्याशिवाय धार्मिक स्थळ किंवा लोकेशन्सच नाव दिलं जातं. जसं की, काशी विश्वनाथ एक्सप्रेस, वैशाली सुपरफास्ट एक्सप्रेस, बिहारच्या वैशाली जिल्ह्याचा संबंध भगवान गौतम बुद्धांशी आहे. वाराणसी नगरी भगवान शंकरासाठी ओळखली जाते. त्यामुळे संबंधित धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणांची नावं ट्रेन्सना दिली जातात.

शताब्दी, दुरंतो आणि राजधानीबद्दल जाणून घ्या

शताब्दी आणि राजधानी या सुपरफास्ट ट्रेन्सनी तुम्ही प्रवास जरुर केला असेल. राजधानी एक्सप्रेस दोन राज्यांच्या राजधान्यांमध्ये धावते. भारताच्या अव्वल दर्जाच्या ट्रेन्समध्ये राजधानीचा समावेश होतो. या ट्रेन्सचा वेग आणि सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. प्रतितास 140 किलोमीटरच्या वेगाने ही ट्रेन धावते. शताब्दी एक्सप्रेस हे नाव कसं ठरलं?

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 100 व्या जन्मदिनी 1989 साली शताब्दी एक्सप्रेस सुरु झाली. 100 वर्षाच्या कालावधीला शताब्दी म्हटलं जातं. म्हणूनच या ट्रेनच नाव शताब्दी ठेवण्यात आलं. ही ट्रेन प्रतितास 160 किलोमीटरच्या वेगाने धावते. त्याशिवाय दुरंतो एक्सप्रेस काही स्टेशन्सवर थांबते. दुरंतोचा अर्थ होतो विनाअडथळा. त्यामुळेच या ट्रेनला दुरंतो म्हटलं जातं. या ट्रेनचा वेग प्रतितास 140 किलोमीटर आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.