जगातला एकमेव देश जो कधीच कुणाचा गुलाम नाही राहिला, भारताचा आहे शेजारी

आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत जो कधीही कुणाचा गुलाम राहिलेला नाही. जगातील तो एकमेव देश आहे. हा भारताचा शेजारील छोटासा देश कधीच कोणाला शरण देला नाही. या देशावर हल्ले झाले पण कोणालाच त्याला गुलाम करण्यात यश मिळाले नाही. कोणता आहे तो देश जाणून घ्या.

जगातला एकमेव देश जो कधीच कुणाचा गुलाम नाही राहिला, भारताचा आहे शेजारी
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 8:57 PM

जगात असे अनेक देश आहेत जे एकेकाळी कुणाचे तरी गुलाम राहिले आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारताचा शेजारी देश नेपाळ हा इतिहासात कधीही कोणाचा गुलाम झाला नाही. अनेक आक्रमणकर्त्यांनी वेगवेगळ्या देशांवर आक्रमण केले, गाव लुटली. भारताचा इतिहास पाहिला तरी हे लक्षात येते की इंग्रजांनी भारतावर दोन शतके राज्य केले. पण तुम्हालाही प्रश्न असा पडला असेल की, नेपाळवर कोणी राज्य का केले नाही?

व्यापाराचे प्रमुख केंद्र

नेपाळ हा तिबेट, भारत आणि चीन यांच्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सर्व व्यापार याच मार्गाने होत होते. त्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की इथपर्यंत पोहोचणे फार कठीण होते. हिमालयातील टेकड्या आणि घनदाट जंगले कोणत्याही आक्रमणकर्त्यासाठी एक मोठा अडथळा होता. तसेच नेपाळी लोक नेहमीच शूर योद्धा राहिले आहेत. गोरखा सैनिकांचे शौर्य जगभर प्रसिद्ध आहे. अनेक युद्धांमध्ये त्यांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. इंग्रजांशी झालेल्या युद्धातही गोरखा सैनिक अतिशय शौर्याने लढले होते.

कोणी-कोणी केले हल्ले

मुस्लीम राज्यकर्त्यांनी अनेकवर नेपाळवर हल्ले केले, पण त्यात त्यांना यश आले नाही. शमसुद्दीन इलियास शाह आणि मीर कासिम यांनी नेपाळवर हल्ला केला होता, पण गोरखा सैन्याने त्यांचा पराभव करून त्यांना परत पाठवले होते.

इंग्रजांनी देखील नेपाळवर राज्य करण्याचाही प्रयत्न केला. 1814 ते 1816 या काळात ब्रिटीश आणि नेपाळमध्ये युद्ध झाले, ज्याला गोरखा युद्ध म्हणतात. या युद्धानंतरच सुगौलीचा तह झाला, त्यानुसार नेपाळने कुमाऊं आणि गढवाल भाग इंग्रजांच्या स्वाधीन केले आणि इंग्रजांनी पुन्हा नेपाळवर हल्ला न करण्याचे वचन दिले.

नेपाळचा इतिहास हा त्या देशाचा इतिहास आहे ज्याने आपले स्वातंत्र्य जपले. नेपाळची ही कथा आपल्याला सांगते की कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी तेथील लोकांची एकता आणि शौर्य खूप महत्त्वाचे असते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.